Breaking
क्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

जिभेवर कंट्रोल नाही

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि. पुणे

0 6 1 1 8 5

जिभेवर कंट्रोल नाही

परवा एक फोन आला आणि त्या व्यक्तीचे वाक्य मनात घर करून गेले. त्याच वेळी ठरवले की यावर उत्तम लेख तयार होईल. माणसाला देवाने दिलेली सर्वांत प्रभावी देणगी म्हणजे आपली वाणी. फक्त माणूस आपल्या भावना बोलू शकतो. जिभेने बोललेले शब्द एखाद्याच्या मनावर अधिराज्य गाजवतात तर कधी त्याच शब्दांनी मनावर खोल जखमही करतात म्हणतात ना ‘जिभेला हाड नसतें.’पण जिव्हारी लागणारे शब्द हाडे मोडू शकतात. जी नाहीत.

आजकाल अनेकदा आपण रागाच्या भरात, विनोदाच्या नावाखाली किंवा क्षणिक भावनेत काहीही बोलून जातो. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, त्याच्या मनावर त्याचा किती खोल परिणाम होईल, याचा विचारच केला जात नाही. मग नंतर पश्चात्ताप होतो. पण बोललेला शब्द पुन्हा परत घेता येत नाही. त्यासाठी बोलताना विचार करूनच बोलावे ” शब्द हा आपल्याच विचाराचा पुत्र असतो “आणि तो आपला विचार योग्य झाला तर त्या शब्दांची योग्य निवड होते आणि आपल्या मुखाद्वारे शब्द व्यवस्थित बाहेर पडतात.

“माझी जीभ अशीच आहे, मी तोंडावर बोलतो! मला मागे बोललेले आवडत नाही.” असे म्हणणे सोपे असते. पण स्पष्ट बोलणे आणि मन दुखावणारे शब्द बोलणे यात खूप मोठा फरक आहे. सत्य बोलावे, पण ते बोलताना शब्दांना माणुसकीची, संयमाची आणि संवेदनशीलतेची जोड असावी… एखाद्याला त्याची चूक दाखवून द्यावी पण ती चूक दाखवताना शब्दांचे भांडण जे आहे ते खूप जपून वापरावे. प्रेमानं त्याची कान उघडणी करावी.

काही जणांना दुसऱ्यांची खिल्ली उडवण्यात आनंद वाटतो. कोणाच्या दुःखावर टोमणा मारणे, चुका उगाळणे, अपमान करणे किंवा नको त्या ठिकाणी नको ते बोलणे. उदा – 2013 साली माझा मोठा एक्सीडेंट झाला होता त्यामध्ये पाच मणक्यांना इजा झाले होते आणि मी जवळजवळ पाच महिने झोपून काढले होते. त्यावेळी एक क्षण नावाची व्यक्ती होती ती मात्र काय होतंय दिसायचं धडधाकट दिसते. असे इतरांजवळ बोलायची. पण ज्यावेळी तिला स्वतःला मणक्यांचा त्रास सुरू झाला स्लिप डिस्क झाली त्यावेळेला तिला ज्या वेदनेतून जावं लागत होतं त्यावेळेला ती स्वतः माझ्याकडे आली आणि मला म्हणाली “वसु तू किती यातना सहन केल्या असतील ग. आत्ता मला जाणवत आहे की वसुला किती त्रास झाला असेल “. मी फक्त हसले तिचे तिला समजले आपण घेतला काय कमेंट देत होते.

जीभ जरी आपल्या मुखात असेल तरी तिच्यावर नियंत्रण ठेवणे आपल्याच मेंदूचे काम आहे. त्या जिभेवर कंट्रोल असणे फार महत्त्वाचे असते. शब्द मुखातून बाहेर पडताना क्षणभर लागतो; पण त्या शब्दांची वेदना मनात अनेक दिवस राहते… जशी ती घटना मी आजही विसरले नाही. 13 वर्ष झाली या घटनेला. बोलण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा.मी जे बोलणार आहे ते आवश्यक आहे का? ते सत्य आहे का? ते समोरच्या व्यक्तीला दुखावणार तर नाही ना?
कधी कधी गप्प राहणे हेच सर्वांत प्रभावी उत्तर असते. प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावेच लागते असे नाही आणि प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर द्यावच लागते असेही काही नाही. शब्दांवर नियंत्रण म्हणजे कमजोरी नव्हे; ती मनाची ताकद आहे.
जिभेवर नियंत्रण ठेवले, तर नाती जपली जातात, गैरसमज टळतात आणि आपले व्यक्तिमत्त्वही अधिक सुंदर बनते. कारण गोड बोलण्याला पैसे लागत नाहीत; पण त्यातून माणसे जोडली जातात.

अजून जिभेवर कंट्रोल नाही या शब्दासाठी आपण असं म्हणूया की आपण जे खातो फार चवीच खातो पण बाहेरचे पदार्थ हल्ली जास्त खाल्ले जातात.ह्या चवीच्या खाण्यामधून आपल्याला काय आजार होतील हे समजत नाही त्यासाठी सुद्धा जिभेवर कंट्रोल नाही हा शब्दप्रयोग केला जातो. पदार्थांच्या चवी साठी सुद्धा जिभेवर कंट्रोल हवा नाही तर आपल्या शरीर आजारांचे घर होईल.. घरचे बनवलेले पदार्थ खावेत जेवढे जास्त शक्य होतील तेवढे घरचेच बनलेले अन्न खावे. हा माझा वैयक्तिक सल्ला राहील.

म्हणूनच मित्रहो!!
बोलण्यापूर्वी विचार करूया,
शब्द जपून वापरूया,
कारण शब्दांची जखम दिसत नाही;
पण ती मनात खोलवर राहते.

आणि घरचेच अन्न खाऊया असा पण करूया कधी शक्य नसेल त्याला तुम्ही निश्चित हॉटेलमध्ये जावे. वाढदिवस साजरे करा पण नेहमी नेहमी बाहेरचे पदार्थ नको.

जिभेवर कंट्रोल नाही,
म्हणत काहीही बोलतात,
शब्दांच्या त्या आघातांनी
कितीतरी मने दुखावतात….
घरचेच बनवलेले पदार्थ खाऊया
आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवूया
नित्य आपली काळजी घेऊन
आपणच आजरांना दूर लोटूया….

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि. पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 1 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे