Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

‘अमोल कोटेवार’ यांच्या साहसी कार्याबाबत पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार

0 4 8 2 9 7

‘अमोल कोटेवार’ यांच्या साहसी कार्याबाबत पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार

सिर्सी पोलीस चौकीचे कोटेवार आहेत धाडसी पोलीस शिपाई

रजत डेकाटे, प्रतिनिधी

सिर्सी:- उमरेड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले सीर्सी गाव. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असल्यामुळे तालुक्यातील गावातून मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग सीर्सी गावातील ग्रामपंचायत संकुलातील गाड्यात आपला व्यवसाय करतात. दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत नाकाबंदी असल्यामुळे सिर्सी पोलिस चौकीचे पोलिस हवालदार श्री.कुणाल ठाकूर ब.क्र. १३५५ व पोलिस शिपाई श्री. अमोल कोटेवार ब.क्र. १४०४ सोबत काही होमगार्ड बाजार चौकातील गाड्यातील फाये ज्वेलर यांचा दुकांनसमोर अनैसर्गिक हालचाली होत्तांना दिसताच पोलिस हवालदार श्री.कुणाल ठाकूर पोलिस शिपाई श्री. अमोल कोटेवार व होमगार्ड हे संशयित ३ ईस्माच्या हालचाली कडे विचारणा करण्यासाठी जाताच ३ ईस्मानी अंधाराच्या संधी साधून तिथून पळ काढला.

फाये ज्वेलर सिर्सी यांचा दुकानाची पाहणी केली असता दुकानाचे दोन्ही कुलूप तोडले होते. श्री अमोल कोटेवार यांचा कर्तव्यदक्षाता घेत मोठ्या शिताफीने सिर्सी गावातील मोठ्या घरफोड्यांच्या होण्यापासून वाचवले. अमोल कोटेवार यांचा तक्रारीवरून समोरील तपास सुरू आहे.कर्तव्यदक्ष अश्या उत्तमकामगिरी बद्धल प्रोत्सहानार्थ बक्षिस म्हणून नागपूर ग्रामीण पोलिस अधिक्षक मा. श्री. हर्ष पोतदार साहेब यांच्याकडून १०,००० रू. देत सत्कार साहसी कार्याबाबत करण्यात आला.

श्री. अमोल कोटेवार सिर्सी पोलिस चौकीला नुकतेच आले असले तरी युवकांचे लाडके अमोल भाऊ झाले. स्पर्धा परीक्षा , पोलिस भरती , होमगार्ड भरती ई. बाबत मार्गदर्शन करतात. पोलिस शिपाई श्री अमोल कोटेवार यांचा उत्तम कार्याची दखल घेत स्वातंत्रदिनी ग्रामपंचायत सिर्सी यांच्यामार्फत सुद्धा शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. सध्या पोलिस स्टेशन बेला व सिर्सी गावात सर्वत्र श्री.अमोल कोटेवार यांचा साहसी कार्याची प्रशंसा होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे