
0
5
1
6
5
1
सुंदर परिवार
ज्यांच्या घर रुपी मंदिरात
राहतो एक सुंदर परिवार
तिथे वाहतो आपुलकीचा झरा
तिथेच खुलतो स्वर्गाचे द्वार
ज्या घरात नांदत असतो
एक स्नेहभावाची अद्भुत शक्ती
तिथे खुलून परमार्थाचे भाव
दिसून येतो त्यांच्यात भक्ती
जेवढे कष्टाने होतो परिश्रम
तेथेच असतो त्यांचा आश्रम
त्यांच्या कर्तव्याची येतो निव दिसून
तेही त्यांच्या उज्वल हृदयातून
एकमेकाचे ठरत असतात प्रेरणास्थान
एकमेकांच्या पावलांवर पाऊल ठेवून
एक मोठे कर्म करतात महान
आयुष्यातील हीच मोठी पुण्याई
लखलाभ ठरतो त्या परिवाराला
घर एक मंदिर येतो फुलून
करतो सुखी समृद्धी जीवनाला
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
==========
0
5
1
6
5
1



