ई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगडसाहित्यगंध
बहिणीची माया
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे श्रीवर्धन जि. रायगड

0
5
9
7
0
2
बहिणीची माया
आई नंतर माया देणारी आहे बहिणीची माया
पाठीराखा तू भाऊ हे बंधन सांभाळाया !!१!!
वेडी बहीण डोळे लावून असेल तुझ्या वाटेवर
होईल तिची निराशा तू नाही गेलास तर !!२!!
‘भाऊ माझा हो साहेब’ अभिमानाने सांगते बहिणीची माया
तिच्या सासरच्याना वाटतो तुझ्या मोठेपणाचा हेवा!!३!!
तू बहिणीचे हे नाते सांभाळ जीव लावून
तिच्या सुखदुःखाच्या वाटेवर साथ तुझी देऊन!!४!!
भाऊ-बहिणीच्या नात्यात वहिनी थोडी कडू
‘वागणे वहिनीचे बरोबर नाही’ सांगेन बहिण रडू रडू!!५!!
तुझ्यावर संकट येऊ नये हेच तिचे मागणे
तू सांभाळून राहा तुला हे मायेने सांगणे……!!६!!
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
========
0
5
9
7
0
2



