0
4
8
2
9
0
सोडून जाताना..
सोडून चाललीस सखी आता
तुला रोज कुठे शोधू
सहवास संपला ग आता
कुठे नाते जोडू
सवय झाली होती तुझी
अंतरीची व्यथा कशी मांडू
कमी जास्त खूप व्हायचे
अधिकाराने कोणाला भांडू
रागवायचे कधी चिडायचे
आता मौन तुझ्या आठवणीत
खूप गोंधळ आहे ह्रदयात
काय कुठे सापडू साठवणीत
पाखराप्रमाणे उडून चाललीस
पाऊल मला उचलत नाही
माझे जीवन इथेच थांबले
मन कुठेच रमत नाही
येशील का परतून कधी
मनी बाळगू का वेडी आशा
भेटशील का अशीच पुन्हा
का होईल माझी निराशा
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
0
4
8
2
9
0



