
0
6
3
0
5
5
कुलस्वामिनी
मोहटा डोंगरी वसली
कुलदेवी गं अंबाबाई
भक्तांवर कृपा छाया
संकटात धावून येई..!!
उंच डोंगरावर मंदीर
दिव्य तेजाची खाण
मोहटा देवी दर्शनाने
लाभे आशीर्वाद दान..!!
कुलस्वामिनी गं माता
संकटकाळी धावून येते
रोग भय दुःख हरवून
कुलाचा उद्धार गं करते..!!
हळदकुंकू साडी नारळ
भक्तीभावाने भरू ओटी
नवसाला पावते जगदंबा
नवरात्रीला भक्तांची दाटी..!!
हात जोडूनी प्रार्थना मी
करते गं कुलस्वामिनी
दे सुख समृद्धी आनंद
परिवार लीन गं चरणी…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
6
3
0
5
5



