Breaking
कोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

छायाचित्रकारासांठी भव्य स्पर्धेचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 0 9 0 3

छायाचित्रकारासांठी भव्य स्पर्धेचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: शहरातील समर्थ कृपा फोटो स्टुडिओ, खानाव आणि अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा या विषयावर अलिबाग मधील छायाचित्रकारांसाठी भव्य छायाचित्र स्पर्धा आयोजित नुकतीच करण्यात आली होती.

या स्पर्धेचे परीक्षण रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट छायाचित्रकार संदीप वाटवे आणि मच्छिंद्र दवंडे यांनी केले. भीमेश्वर मंदिर देवस्थानचे डॉ. मकरंद आठवले आणि इतर विश्वस्तांनी या स्पर्धेसाठी भिमेश्वर मंदिराचे ठिकाण निवडल्याबद्दल असोसिएशनचे आभार व्यक्त केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मंदार शिर्के याच्या छायाचित्राला देण्यात आला, द्वितीय क्रमांक विराज घरत,
तृतीय क्रमांक नीलेश दुदम तर वैभव शिंदे आणि रवी गुंड यांना उत्तेजनार्थ म्हणून घोषित करण्यात आले.

समर्थ कृपा स्टुडिओचे संतोष पाटील, विजय पाटील यांनी अतिशय नियोजनबद्ध या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यांना अमर मढवी , निलेश दूदम ,मनोज पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. स्पर्धेत 17 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी संदीप सरांनी मोलाचे मार्गदर्शन करीत छायाचित्रकारांनी या डिजिटल युगात अपग्रेड होणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला.

रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओ ग्राफर असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, अलिबाग असोसिशन चे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश पाटील, जे एम के इन्फोसिस चे संचित कदम आदींच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रिया पाटील यांनी केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे