Breaking
आरोग्य व शिक्षणकविताकोकणखानदेशचारोळीदादरा नगर हवेलीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘मदतीचा हात’ हा कायमच्या कुबड्या होता कामा नये; स्वाती मराडे

गुरुवारीय चित्रचारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 9 0

‘मदतीचा हात’ हा कायमच्या कुबड्या होता कामा नये; स्वाती मराडे

‘गुरुवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

भरली ज्यांची ओंजळ फुलांनी, त्यांनी थोडा गंध लुटावा. असेल कुठे जर सडके जगणे, गंध सांडुनी सोहळा व्हावा. ओथंबलेल्या मायेने, कुणा सांत्वनी धीर द्यावा. दु:ख दाटल्या नयनातील, जमेल तसा नीर प्यावा. साठला जर काळोख कोठे, पणती होऊन उजेड करावा. पांघरूनी पहाट तेथे, उष:कालाचा मंत्र जपावा. दिसले कोठे जर का कोणी, वेढलेले अज्ञानानी.. घट ज्ञानाचा रिता करूनी, सन्मार्ग तो दाखवावा.. गिरीशिखरावर जो जो पोहोचला, दुजास त्याने हात द्यावा. झुकण्यासाठी तेथे मग तो, अहंकार ना आड यावा. घन ज्यांचे भरलेले त्यांनी, तृषार्त ओठी द्यावे पाणी. जणू भरल्या अंजलीतील, जाईल पाकळी ईशचरणी.. एक हात मदतीचा, हीच तुझी रे ईशसेवा. पुण्यसंचयी कामी येईल, यथायोग्य हा मार्ग नवा.

खरंय ना..सोबत काय नेणार. ‘अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणुनी.’ सोबत न्यायचा आहे तो पुण्यसंचय. चिरंतन समाधानाचं तेज देणारा. हा पुण्यसंचय मिळवायचा कुठून. रंजल्या गांजल्यांना मदत करून, अज्ञानास ज्ञानी करून, गरज ओळखून हात देऊन, पडलेल्यास उभे करून. हे करताना त्याला खरोखरच स्वपावलावर उभे करून पुढे मार्गक्रमण करता यावे हाच प्रयत्न व्हावा, न की त्याच्या कायमच्या कुबड्या व्हावे. दानसुद्धा सत्पात्री पडावे असे म्हणतात. अगदी तसेच मदतसुद्धा योग्य गरजवंतास व्हावी. केलेली मदत कधी वाया जात नाही हेही तितकेच खरे. कबुतर व मुंगी यांची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असेल. एकमेकांना केलेली मदत प्राण वाचवून गेली. जर प्राणी हे तत्व पाळत असतील आपण का आपल्यातील हा झरा निरंतर वाहता ठेवू नये?

आज ‘गुरुवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र मदतीचा हात देणारे. चित्र पाहताच आठवले ते ‘घेता घेता देणाराचे हात घ्यावे’. कुणीतरी आपल्याला योग्यवेळी मदत केली याची जाणीव ठेवून आपणही कुणालातरी मदत करावी. त्याने आणखी दुस-या कुणालातरी. एखाद्याचं जगणं सुसह्य करणारी मदतीची ही साखळी अखंड वाढत रहावी. मनामनात मानवतेची ज्योत पेटावी‌ या व अशा अनेक विचारांभवती मन फिरू लागले. आपणा सर्वांच्या रचनेतही याची अनुभूती आली. आजच्या रचना खरोखरच अष्टावधानी लेखणीचा आविष्कार. या वैविध्यपूर्ण लेखणीसाठी सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ स्वाती मराडे,इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक,कवयित्री, लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे