चंद्रपूरविदर्भसाहित्यगंध
प्रसिद्ध कवी प्रा. भारत झाडे यांचे दुर्धर आजाराने निधन
विदर्भातील काव्यतारा निखळला
0
4
0
9
0
3
प्रसिद्ध कवी प्रा. भारत झाडे यांचे दुर्धर आजाराने निधन
विदर्भातील काव्यतारा निखळला
चंद्रपूर: मराठी काव्यक्षेत्रातील चमकता तारा असलेल्या बाबुफेड वार्ड चंद्रपूर येथील प्रसिद्ध कवी प्रा भारत झाडे यांची आज सकाळी ११.०० वा. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक महिन्यापासून प्रा भारत झाडे सर हे कर्करोग या आजाराशी झगडत होते. अनेक उपचार करूनही औषधोपचाराचा फारसा उपयोग झाला नसल्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली. गत सप्ताहातच त्यांची अखेरची इच्छा जीवन गौरव साहित्य परिवाराचे प्रमुख गणेश कुंभारे यांनी त्यांचा ‘जीवनार्थ’ हा कवितासंग्रह काढून पूर्ण केली होती. आज त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहेत.
0
4
0
9
0
3





