0
4
8
2
9
0
सारा मायाजाळ आहे
कुणी जपे कुणासाठी, उगीचच माळ आहे…
सत्य काही वेगळेच,सारा मायाजाळ आहे…
किती केला त्याग जरी, पर्वा कुणास असते…
सत्याला जो जपतोय,त्याचा होतो जाळ आहे…१
किती लावा जीव भोळा, किंमत तयाची शून्य…
मतलबी ही दुनिया, प्रेमाचा दुष्काळ आहे…२
नाही बाकी बंधूभाव, नाही बाकी आपुलकी…
प्रितीच्या नावे पेटवी, तिरस्कार जाळ आहे…३
जीवापाड जपतांना,केले सर्वस्व अर्पण…
तरी तयांनी केलेत,मज टाळाटाळ आहे…४
त्यांच्या सुखादुखातही,समजले सुखदुःख…
नाही उगवली तरी,कधीही सकाळ आहे…५
उमेद झाली परास्त,भंगलेत सारे स्वप्न…
“सुधाकरा” दुरापास्त, असह्य हा काळ आहे…६
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर, नागपूर
========
0
4
8
2
9
0



