बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या काव्यरचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*🥀विषय : उधाण वा-याचे🥀*
*🍂बुधवार : ०४/ मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*उधाण वाऱ्याचे*
मन उधाण वाऱ्याचे
क्षणातच दिसेनासे
नाही कळत कधीच
याचे रंगरूप कसे….!!
कधी कोमल सुमन
गंध सर्वांना भुलवी
कधी शिशिर गळती
कधी आशेची पालवी…!!
मन श्रावणाच्या सरी
करी चिंब स्वप्न वेली
येती खुलून साऱ्याच
व्यक्त होण्यास अबोली…!!
कधी नभातला पक्षी
ग्रह ताऱ्यातून फिरे
कधी अथांग सागर
लाटेसम धावणारे…!!
मन उधाण वाऱ्याचे
पण नियंत्रण हवे
नको चुकीचे वागणे
नित्य मना बजवावे…!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वा-याचे*
वाहतो हा उधाण वारा
अंगावर निघे शहारा..
गालावरती फिरतांना
बटांशी मस्ती करतांना
ना लागे याचा थारा
अंगावर निघे शहारा..
नभास कसा बिलगतो
साद पावसास घालतो
थेंबाचा करतो मारा
अंगावर निघे शहारा..
केसांमध्ये गुंफतांना
मानेशीही झुलतांना
सांगतो गुपित सारा
अंगावर निघे शहारा..
श्वासात गंध दरवळतो
हृदयातही स्वर दाटतो
गाठे हा मनाचा किनारा
अंगावर निघे शहारा..
बघेना गाव अन् शीव
सारीकडेच याची धाव
फोडी मग हा बंधारा
अंगावर निघे शहारा..
आभाळही खाली झुले
स्पर्शांनी दाटे ढग फुले
पावसात धुंद अंगारा
अंगावर निघे शहारा..
रूप उधाण वा-याचे
कवाड खुले ह्रदयाचे
प्रितीचा दरवळ सारा
अंगावर निघे शहारा..
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वाऱ्याचे*
प्रितीतले प्रेम गड्या,
गेले उडून साऱ्यांचे…
उरलाय पश्चात्ताप,
मूल्य मोजता ताऱ्यांचे…१
मनी जपल्या प्रितीची,
गती झाली पतंगाची…
जरी उडलो नभात,
धागे तुटती दंग्याशी…२
वाहे वारे दिशाहीन,
प्रितीमध्ये होता लीन…
होतो हतबल देह,
प्रारब्धाचे तत्व क्षीण…३
तरी झेलावे ध्यानस्थ,
लक्ष्य भेदण्या साऱ्याचे …
*सुधाकरा* बिनधास्त,
करा *उधाण वाऱ्याचे*…४
*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*उधाण वा-याचे*
आले उधाण वार्याचे ,संगे वादळ तुफान।
मानवता विसरूनी ,लोक वागती बेभान।।
युध्द कशाला करता,सोड विचार युध्दाचा।
सन्मार्ग कल्याणाचा,धर गौतम बुध्दाचा।।
शांती जगास देणारा,सदधम्म हाच खरा।
पंचशील अष्टांगाला,शुद्धीसाठी अनुसरा।।
क्षणभंगुर आयुष्य,जगू सारेच सजीव।
प्रेम आनंद वाटून,करु एकमेकांची किव।।
मैत्री अहिंसा करुणा,आचरण जीवनात।
नीळेपण या नभाचे,बसवूनी ह्रदयात।।
विक्रुत प्रव्रुतीने रे,हाणी होते निसर्गाची।
पानं पिंपळाचे होऊ,घेऊ काळजी मुळाची।।
जिकडे तिकडे लागे धगधगती ती आग।
नका उजाड करु रे,गाव वस्ती फुलबाग।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वाऱ्याचे*
मन उडते पाखरू
मन अल्लड वासरू
मन उधाण वाऱ्याचे
कसे आवरू सावरू
मन असे मृग मृग
वेडे कस्तुरीच्या मागं
भासमय स्वप्नापायी
करी जीव तगमग
मन सागराची लाट
मन सरीतेचा काठ
कधी खवळतो भारी
कधी संथ. नदीपरी
मन विशाल ते गड
मन इवलेसे तिळ
कधी चाले धीरोदात्त
कधी काढी मागे पळ
मन अमृतासमान
मन विष हलाहल
त्याला जप रे माणसा
नको करू कोलाहल
मन उधाण वाऱ्याचे
नको अती त्याचे लाड
जवा धरी वाम पथ
दाव त्याला तव बळ
तुझ्या हाती रे माणसा
तुझ्या मनाची रे दोरी
सत्कर्माच्या धाग्यानेच
घेई. नभात भरारी
”
*सौ वनिता गभणे, आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वार्याचे*
मंद झुळूक वार्याची
करी शीतल मनाला
मन होईल प्रसन्न
येई उधाण वार्याला
मन फिरे सैर भैर
मन नाही एका ठिका
मन असे चंचल
घेई वार्या संगे झोका
मन उधाण वार्याचे
त्याची काय सांगू बात
येई आनंद लहर
देई जीवनाला साथ
मन असे उदास
अंधाराची असे छाया
कुठे शोधावा प्रकाश
स्वप्नांची मनावर माया
मन समुद्राच्या लाटा
शोधू अंतरीच्या वाटा
येई उधाण वार्याचे
गीत गाऊ आनंदाचे
*श्री.पुरुषोत्तम ठोंबरे*
*झिंगाबाई टाकळी, नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वाऱ्याचे*
केस धुंद मोकळे
मेघचि जणू सावळे
मन आठवांचे तळे
उमलली शत कमळे
ती रात्र पावसाळी
दूर दिव्यांच्या ओळी
कवेत माझ्या जवळी
मुग्ध गोजिरी तू कळी
केसातून पाण्याचे मोती
गालावर तव ओघळती
ओठांवर फुले उमलती
भारावलो मी गं किती!
उधाण वाऱ्याचे आले
या उदास सायंकाळी
मनी गुंजते ही विराणी
स्मरतो प्रीत नव्हाळी
क्षितीजावरी रेखियली
नक्षी फिकटशी झाली
तुझ्या आठवांनी उरी
वेदनाच दाटून गं आली
हा चाफा गंधाळला
भेटीचा क्षण आसवला
स्मरता मधाळ मिठीला
गहिवर मनी हा ओला
गंधाळत वारा आला
इशारा का मजला दिला?
कि भासची हा आगळा
मनी गहिरा गंध भरला
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*उधाण वार्याचे*
ऐकूनी तरी घे ना सखे
बोलणे उधाण वार्याचे
फुलणे पाना फुलाचे
खुलणे चंद्रमा तार्यांचे.. //
खेळतोय तुझ्या बटाशी
घुटमळतो का कानाशी
धवल सडाच अंथरलाय
बघ पायघड्या आकाशी.. //
याच वार्याच्या तालावर
बघ फुले कशी डोलतात
रंग, गंध,मकरंद उधळत
भ्रमराशी काय बोलतात.. //
अलवार शिळ वार्याची
वाजत नाही का कानात
अनामिक हूरहूर तुझ्या
माजत नाही का मनात.. //
कळेना का आर्त हाक
माझ्यातल्या चकोराची
सखे तू पिटूर पूनव रात
किती प्रतिक्षा होकाराची..//
मी रूप उधाण वार्याचे
बोलू पाहतोय तुझ्याशी
खोलू पाहतो गोड गुपित
गुजगोष्टी कर माझ्याशी.. //
या युगल ह्रदयात बिगुल
वाजू दे सूचक संकेतांचे
तू कोकिळ बनून छेडावे
सप्तसूरात गाणे वसंताचे.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



