शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*☄विषय : सुखाच्या वाटा*☄
*????शनिवार : ०७ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*सुखाच्या वाटा*
दुःखावर मात करता करता
सुखाच्या वाटा दिसतील
नव्या उमेदीने जगत रहा
क्षण आनंदाचे नक्कीच येतील
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
आपल्या आपण शोधाव्या
सुखाच्या वाटा
कष्टाच्या घामानेच मिळती
आनंदाच्या लाटा
*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
समाधानी विचारतच
खरे तर सुखाच्या वाटा
तो जर असेल अंतरंगात
तर नाहीच आनंदाला तोटा
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
त्या सुखाच्या वाटा
मजसाठी अनभिज्ञच राहिल्या
कधी आर्थिक तर कधी शारीरिक
लपंडाव खेळत राहिल्या
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
आयुष्यभर चाळल्या मी
अनेक सुखाच्या वाटा
दुःख माझा सांगाती सदा
हृदयी सलत राहिला काटा
*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
आई नेहमीच शोधत असते
बाळासाठी सुखाच्या वाटा
घासातला घास राखून ठेवते
स्वत:तील खाऊचा वाटा ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
कष्ट करा प्रामाणिक आता ,
चालून येतील सुखाच्या वाटा ,
नकोच कामात अलगर्जी ,
हीच सगळ्यांची मर्जी .
*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
*शोधण्या सुखाच्या वाटा*
*सारी हयात सरली*
*सापडली तेव्हा कळले*
*जगण्याची उमेदही सरली*
*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक*
*ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
प्रेम ,जिव्हाळा ,ममता पांघरून
स्वार्थ , मतलबाला द्यावा फाटा
नकळत परत येतील ना
निरंतर सुखाच्या त्या वाटा
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
*सुखाच्या वाटा*
सुखाच्या वाटा शोधताना कधीतरी
अपयशाचे पायी काटे ही टोचतात…
पण आत्मविश्वास अन् दृढ संकल्पाने
मनाचे स्वप्न क्षितिजावर पोचतात..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????☘️????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖





