0
4
8
2
9
0
आठवणी कुशीतल्या
अजूनही आठवते दिवस
तू शेतातून येण्याचे
भिरभिरणारे आतुरलेले
डोळे तुला बघण्याचे ….१
तुझा धरुनिया पदर
मागे मागे तुझ्या चालावे
भास होता कितीतरी
दिवसांनी भेटणे व्हावे….२
खूप काही सांगावे तुला
गाऱ्हाणे भावंडाचे
मी किती चांगला ते
किती वाईट सांगण्याचे….३
पाय धुवूनी जवळ घेशी
मला मायेच्या प्रेमाने
डोक्यावरून फिरता हात
खुले मन आनंदाने………४
गेले ते दिवस राहिल्या
त्या आठवणी फक्तची
परत दयावे जन्म मला
आठवण येते कुशीची……५
डॉ. बालाजी राजूरकर
ता.हिंगणघाट, वर्धा
=======
0
4
8
2
9
0



