Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरभणीसाहित्यगंध

दिवाळी अन् माझी आई सारखीच

नरेंद्र गंगाराम साबळे ता. गंगाखेड, जि. परभणी

0 6 3 8 2 8

दिवाळी अन् माझी आई सारखीच

दिवाळी आमची थोडी जगावेगळीच आसायची. सुरुवात कुठून करावं कळत नाही. आजी आजोबा संपन्न होते, असे आई वडील सांगायचे. कालांतराने त्यात थोडा बदल झाला. पण आईचा उत्साह दिपावली सारखाच नेहमी अगदी गौरी, गणपती झाले की ती दिवाळीच्या तयारीत लागे. पूर्वी कधी कधी एक, दोन वर्ष आम्ही गावाकडे राहत होतो. वडीलांची बदली झाले की ठिकाण बदलत असे. मग जिथे आम्ही असायचो, तिथेच सर्व सणवार साजरे होत. मग गावाकडे आई शेणाने घर सारवायची, हिरवेगार तुळस दारात असायचे. माझ्या बहिणी कार्तिक मास करत, कार्तिक स्नान पहाटेच करीत, मंदीरात रांगोळी काढत. त्या रांगोळीवर दिवा लावत.

दारात रांगोळीसाठी वटा केला होता, त्यावर सुरेख रांगोळी काढून दिवा लावत. तुळशीची विषेश पूजा कार्तिक मासात करत. दिवाळीची सुरूवात वसुबारस पासून होत होती. त्या वेळी इतकी झगमगाट नव्हती. काही ठराविक लोकच पूजा पाट करत. आम्ही फक्त लाडू, करंजी, अनारसे, चिवडा हे करून खायचं. मग तिन चार दिवस दिवे लावत ते पण पाच किवा अकरा. काही दिवाळीत पूजा असायच्या त्या नेमाने होत यमदिप दान. गायवाडा तो गायच्या शेणापासून तयार करत, त्यात बळीराजाचं वैभव संपन्नता दाखवली जायची. पाची पांडव पूजा आसायची, पांडव राजवाड़ा केला जायचा, तो पण शेणापासून, त्याला नैवेद्य दाखवला जायचा.

अभ्यंगस्नान पहाटे चार वाजता होत असे. पहिलं पाणी आणि दुसरं पाणी म्हणत दोन स्नान होत असे. सकाळी शेवई, भात, गरम गरम भजे हे शाही भोजन असे.पाढव्याच्या दिवशी पुरण पोळी असायची. भाऊबीजेला करदोडा देऊन ओवाळीत. जसे गाव बदलायचे, तसे नवनविन नियम आले.
आई दिवाळीत प्रत्यक पूजा पाट त्याच श्रद्धेने करायची, जशी गावाकडे करत होती अगदी तशीच.

आता दिवे असंख्य लावले जातात. फराळात पण भरपूर पदार्थ केले जातात. फुले, तोरण सगळे केले जाते. फटाके, आकाश कंदिल नाममात्रच. गावाकडे ती दिपावली असायची ती दिसेना आता. बोलण्यात निवांतपणा नाही, जिव्हाळा, प्रेम, अपुलकी तर लांबच. त्या वेळी दुस-यांनी फटाके वाजवले तरी आनंद वाटे. आकाशदिवे पण कुणीतरी घरी लावायचेच, ते बघायची किती मज्जा वाटत होती. आज सर्व काही आहे; पण ते दिवस, ती माणसे नाहीत. त्याच माणसात सकारात्मक ऊर्जा होती, त्यामुळे प्रसन्न वाटत होते. दिवाळीची ओढ आसायची, नवीन केलेंडर घेतले की आधी दिवाळी कधी आहे बघायचे. आता दिवाळी कधी आली ते समजेना.

लहान नातवंडाची काळजी, स्वयंपाकघर, घरात घरभर माणसं. पाणी आडाचे शेंदून आणावं लागत असे. मी सारखं आईकडे बघत बसायचो. ती एकटीच सर्व करीत असायची. वडील फक्त किराणा माळवं आणून टाकत. आई मी अजूनही तीच दिवाळी करतो. त्यात तू आहेस, तीच दिवाळी माझी होती. तुझ्या शिवाय मन नाही लागत. ती पहाट आठवते अजून मला पारीजात गंधाळीत;तुझ्या हाती शेण होते. त्याचा सुगंध घरभर त्यात तू चंदन मिसळवत होतीस. कधी यईल तो पुन्हा सुवास. माझ्या नेत्रातून वाहते तुझ्या त्यागाची धार. दिवाळीच्या दिव्यात तुझी आत्मज्योत, चल मांडू या गायवाड्याचा तो खेळ.

ही दिवाळी प्रत्येक माणसागणिक, भाव-भावना वेगळी असते. लहान मुलाला फटाके, मुलीला रांगोळी. आई वडील लेकीची -शिक्षण नौकरीसाठी परगावी गेल्यात. मुले, मुली, नातवंड यांची वाट पाही. माहेरला येता आले नाही म्हणून, शेजीबाईला माहेरचा मोठेपणा सांगताना ती त्या वैभवशाली जन्मभूमीचं गुण गाते….

“काय सांगू शेजीबाई माझ्या माहेरचा मोठेपणा ?
दवं भिजल्या गुलाबातुन पारिजातकाची वाट…”

तिच्या मनातील भाव भावना, आई किती सहज व्यक्त करते आणि पुन्हा कामाचं ओझं ती डोईवर पेलते. हे चित्रण मला गाव-शहर दोन्ही मध्ये दिसायचे. मग माझे मन आपसूक म्हणायचे, “प्रकाशाचे किती रंग, या प्रकाश पर्वात अख्खे जीवन जाई दिप उत्सवात उजळून. ग्रामीण, शहरी दिपवर्षावात! प्रेम, विरह, ममता, वात्सल्य, मंद मंद प्रकाश!

“या प्रकाशपर्वात न्हाऊन जाई दिन रात,
पणती की दिवा प्रकाश दोन्हीच नाव..”!

नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड, जि. परभणी
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 8 2 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे