ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेरायगडसाहित्यगंध
आनंद या जीवनाचा
पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर, जि.पुणे

0
5
2
4
6
0
आनंद या जीवनाचा
आनंद या जीवनाचा
उधळतो मी आसमंती
झाला व्यापार सुखाचा
नाही कसलीच भ्रांती
जे वांछिले ते मिळाले
लाभ थोर हा झाला
मी तृषार्त जाणिवांचा
प्राशिला अमृत प्याला
अपेक्षित घडले सारे
या जीवनाच्या मार्गात
सुख झाले उदार बहु
दुःख विराम हर्षात
दिन पालटले वेदनेचे
झाला आज भाग्योदय
पराजित आसूडांचाही
झाला घवघवीत विजय
आनंद या जीवनाचा
करील दैदीप्यमान भविष्य
झाले जन्माचे सार्थक
अवघे सफल आयुष्य
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
=========
0
5
2
4
6
0



