उच्च प्राथमिक शाळा, मांडवा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

उच्च प्राथमिक शाळा, मांडवा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
वर्धा, (दि २९ सप्टे.) : वर्धा जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती, वर्धा येथील उच्च प्राथमिक शाळा मांडवा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली होती. आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसनाजी बावणे, उदघाटक म्हणून माजी प. स. सदस्या वंदनाताई बावणे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणविस्तार अधिकारी सौ चेतना भुते, केंद्र समन्व्यक विक्रांत सहारे, मुख्याध्यापक प्रमोद मुरार आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता चर्चा, शिक्षणाचे उदिष्ट, यासह विविध शैक्षणिक विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. या शिक्षण परिषदेला संजय वैरागडे, प्रवीण लोहे, भगवान मेश्राम, योगेश भडंगे, शंकर मरस्कोल्हे, महेश गाडगे, वासुदेव कलोडे, किशोर शिरसागर, सोमवंशी मॅडम, तक्षणा लोहकरे, भारती देशमुख, मनीषा गाडगे, प्रतिभा गावंडे, प्राजकता गोटे, हर्षाली टिपले, नरेश ढोके, विवेक मोरे, अनिल चरडे, दिवाकर बेहरे, अवन्ति गायकवाड, सोरते, कातोरे आदिसह विविध कर्मचारी उपस्थित होते.



