
0
4
0
8
9
0
हुंडा कुठं मागितला आम्ही?
हुंडा कुठं मागितला आम्ही
फक्त पंधरा तोळे सोनं द्या
मुलगी तुमची नौकरीवाली
फक्त 50 साड्या ड्रेस द्या….!!
नौकरी करून सुद्धा तिला
करावे लागेल सर्व घरकाम
ऑफिसमध्ये दिवसभर ती
खुर्चीमध्ये करते ना आराम..!!
नवरा म्हणतो पगार सर्वच
माझ्या आईकडे तू द्यायचा
तिच्या परवानगीशिवाय तू
पैसा खर्च नाही गं करायचा…!!
आई बहीण भाऊ भाचे
कर आदर नि पाहुणचार
ऐकून घ्यायचे टोमणे सर्व
बोललीस तर मिळेल मार…!!
माहेरी जायचं तू आता
नाव सुद्धा घ्यायचं नाही
इथे झालेलं फोन करून
सांगायचं नाही कधी काही…!!
जमत असेल एवढं तुला
तरच नातं आपलं जमणार
नाहीतर लवकरच मी मग
तुला सोडचिट्ठी बघ देणार…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जि.बीड
0
4
0
8
9
0





