Breaking
ई-पेपरकवितावर्धाविदर्भसाहित्यगंध

वेड्या मना

डॉ. बालाजी राजूरकर हिंगणघाट जि. वर्धा

0 4 8 2 8 4

वेड्या मना

कसं समजावू मी तुला,
अरे माझ्या वेड्या मना?
शक्य नसलं मला तरी,
कसा पुरवू तुझा हट्ट—सांग ना?

कधी फिरतोस तू नभात,
आणतो म्हणतो चांद–तारे,
प्रियसीला रिझविण्यास,
थापा मारतोस कशा रे?

कधी तुझा आकार असा,
अंतराळात नसे सामावत,
कधी असतोस एवढा की,
सुईच्या टोकावरच बसत.

बहिणाबाईंना दिसलास,
ढोर बनुनी उभ्या पिकात,
मुजोरी करण्यात पटाईत—
अशीच आहे रे तुझी रीत.

आली सुंदरी एखादी,
मग कुणाचं ऐकत नाही,
नाही भेटली ती जर साधी,
तर झोपही लागू देत नाही.

डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे