Breaking
क्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसुधा नाईक, तर कविसंमेलनाध्यपदी प्रा.विजय काकडे

दि.४ ऑगस्टला पुणे येथे संपन्न होणार संमेलन

0 4 8 3 0 0

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसुधा नाईक, तर कविसंमेलनाध्यपदी प्रा.विजय काकडे

दि.४ ऑगस्टला पुणे येथे संपन्न होणार संमेलन

वसुधा नाईक,पुणे

पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३ रे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी ( पुणे ) येथे रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे.या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यपदी सुप्रसिध्द साहित्यिका वसुधा नाईक यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सुप्रसिध्द साहित्यिक शरद गोरे यांनी दिली आहे.

नाईक यांनी आजवर शब्द फुलांची ओंजळ, गुंजन मनीचे सह ८ ग्रंथाचे विपुल लेखन त्यांनी केले आहे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे,तर या साहित्य संमेलनाच्या कविसंमेलन सत्राच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द कवी,प्रा.विजय काकडे यांची निवड करण्यात आली आहे.

आजवर काकडे यांचे भास आभास, माझा शाळेचा प्रवेशदिन सह एकूण ५ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत,एक दिवशीय होणार्या या साहित्य संमेलनात मोठया संख्येने साहित्यिक सहभागी होणार आहेत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर यांनी २९ वर्ष अविरतपणे साहित्य संवर्धनाचे कार्य केले त्यांच्या स्मृति निमित्त या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते.

साहित्य संमेलनाच्या संयोजनासाठी साहित्य परिषदेचे माजी विश्वस्त किशोर टिळेकर,पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामूगुडे, पुणे जिल्हाध्यक्ष (पूर्व ) प्रा.सुरेश वाळेकर ,जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी घुले,पुणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर शहर उपाध्यक्ष सिंधू साळेकर इत्यादी परिश्रम घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे