0
4
8
2
9
0
काटा रूतला
रडत लंगडत
बाळ घरी आला
फतकल मांडून
रडायला लागला
आई म्हणे भिऊ नको
काय झाले सांग
बाळ म्हणे बोरासाठी
लावली होती रांग
बोरीखाली शोधत
होतो आंबटगोड बोरे
माळी आला धाऊन
तसे पांगली पोरे
सांभाळत झोळी आपली
पळायला लागलो दूर
काटा रूतला पायात
आला आसवांचा पूर
आई हसली अलगत
कुरवाळते छोटे पाय
खसकन काढला काटा
म्हणे झाले कुठे काय
सविता धमगाये
जि.नागपूर
==========
0
4
8
2
9
0



