Breaking
ई-पेपरनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

माळी महासंघाच्या नागपूर विभाग पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी गजानन ढाकुलकर यांची नियुक्ती !

हिंगणा तालुक्याला संघटनेत महत्त्वाचे स्थान

0 6 8 3 0 9

माळी महासंघाच्या नागपूर विभाग पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी गजानन ढाकुलकर यांची नियुक्ती !

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांच्या कडून नागपूर विभागाच्या कार्यकारिणीची घोषणा

हिंगणा तालुक्याला संघटनेत महत्त्वाचे स्थान

हिंगणा शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर/ हिंगणा : माळी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी विविध विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर विभागाच्या पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी हिंगणा तालुक्यातील गजानन वामनराव ढाकुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे हिंगणा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. रवींद्र काशिनाथ अंबाडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीने विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात सविस्तर अहवाल सादर केला. त्यानुसार महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, पुणे, नाशिक आणि मुंबई-कोकण अशा ७ विभागांची रचना करण्यात आली आहे.

या घोषित कार्यकारिणीत नागपूर विभागाच्या पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी गजानन वामनराव ढाकुलकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ढाकुलकर हे हिंगणा तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय आणि स्थानिक जनसमस्यांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रावरून स्पष्ट होते.

माळी महासंघाच्या नागपूर विभागाच्या कार्यकारिणीत विविध आघाड्यांचे अध्यक्ष, महासचिव, उपाध्यक्ष आणि सचिव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच जिल्हास्तरीय कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांच्या स्वाक्षरीने दिनांक.२७ नोव्हेंबर २०२६ रोजी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल गजानन ढाकुलकर यांचे विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

माळी महासंघच्या नागपूर विभागीय कार्यकारीणी मधे आपली.निवड झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचे आपण निश्चित सोन करून स्वतःला व माळी महासंघ ला एक वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवाल व समाजाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाल याची मला खात्री आहे.

अविनाश ठाकरे
राष्ट्रीय अध्यक्ष, माळी महासंघ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 8 3 0 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे