0
5
4
1
0
2
श्रावणधारा
श्रावणधारा झेलीत
धरती सर्वांग भिजली
हिरव्या रंगात काया
ती अधिकच खुलली.
अंगणात रिमझिम
पडती श्रावण धारा
खट्याळ मनमोराचा
फुलला सारा पिसारा.
जलरूपी दवबिंदू
तृणावरी ओघळले
आनंदून नदिनाले
भरून वाहू लागले.
ढगांचे शुभ्र केस
वाऱ्यावर भिरभिरती
विजेच्या आवाजामुळे
मनोमन शहारती.
सर्व झाडांची भिजले
फांद्यावरची ती पाने
प्रत्येकाच्या ओठी येई
चिंबचिंब पाऊस गाणे.
दीपककुमार सरदार
तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
==========
0
5
4
1
0
2


