जे. एस. एम. महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
जे. एस. एम. महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: जे. एस. एम. महाविद्यालय अलिबाग येथे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन शिरीष पाटील जिमखान्याच्या वतीने दिनांक 10 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मैदानी फुटबॉल, हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन, कॅरम, चेस, टेबल टेनिस, व क्रिकेट या खेळांचे आयोजन करण्यात आले.
या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.गौतम पाटील यांच्या शूभ हस्ते फार पडले. या कार्यक्रमांमध्ये इंडियन स्ट्रिट प्रीमियर लिग मध्ये फॅलकन रायझर्स हैदराबाद या संघाकडून निवड झालेल्या जे.एस.एम. महाविद्यालयातील एफ. वाय. बी. कॉम. या वर्गातील शिकत असलेला आर्यन खारकर याचा विशेष गुणगौरव करण्यात आला व त्याचे माननीय अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ व टेनिस क्रिकेट बॅट देऊन सत्कार करण्यात आला.सया बक्षीस समारंभामध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या स्पर्धकांचे मेडल्स व ट्रॉफी देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील ज्युनिअर कॉलेजचे सुपरवायझर श्री. अजय सावंत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्याध्यक्ष प्रा. गौरी लोणकर, उपकार्याध्यक्ष श्री. जे. डी. पाटील, सीनियर कॉलेज जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चिखले, जुनियर कॉलेज क्रीडा शिक्षक श्री. बजरंग गुरव हे उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन वार्षिक क्रीडा स्पर्धा समिती व जिमखाना समितीच्या वतीने यशस्वीरित्या पार पाडले.





