
0
5
6
8
0
4
स्वप्नातलं जग
रात्री डोळे मिटताच मी
पोहचते स्वप्नाच्या गावी
तिथे नदी दुधाची वाहे
अन् झाडावर चॉकलेटची मावी
हत्ती मामा सायकल चालवी
माकड काका गातात गाणे
परीच्या पंखावर बसुनी
करते मी आकाशात उड्डाणे
शाळा तिथे रंगीबेरंगी
अभ्यास नाही फक्त खेळ
बाई पण माझ्याबरोबर
खेळतात लपाछपीचा मेळ
चांदोमामा देतो खाऊ
चांदण्या देती गोड हसू
इंद्रधनुष्याचा झोका घेऊन
मी झोके घेते हसू हसू
आई हाक मारते उठ बाळा
स्वप्न तुटते डोळे उघडतात
पण मनात राहते माझ्या
स्वप्नातलं जग नाचत
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल, जि.चंद्रपूर
0
5
6
8
0
4


