0
4
8
2
9
4
हरहुन्नरी
काहींची रेखीव रांगोळी उमटते मनावरी
कवितेचे चित्र रंग , रंगतात संपूर्ण घरावरी
सुगरण असतात, कोपऱ्यांत सजतात कलाकुसरी
काही मनमोकळ्या स्त्रिया असतातच हरहुन्नरी
मन मारूनच ना?
कशास लपवितेस अश्रूंना?
तुला वाटतोय मी फक्त आरसा ना ?
पण वाचतोय मी तुझ्या मना
जगतेस तू, मन मारूनच ना?
आत्मशक्ती
लहान अथवा महान, नसे फार अंतर
कार्ये नेती तडीस, करून कर्म भव्य
संकटांचे दिव्य ,लिलया करती पार
केवळ आत्मशक्ती च्या जोरावर
स्वाती लभाने
ता. जि.वर्धा
0
4
8
2
9
4



