0
4
8
2
9
0
अल्याड पल्याड
अल्याड आहे गाव माझे पल्याड तुझे गाव सख्या
भेटू आपण कधी कुठे नाही कुठलाच ठाव सख्या
पैलतिराकडे वेध लागले तू येण्याचे आभास किती
मन हे वेडे आतुरले पण दिसे ना तुझी नाव सख्या
या नदीच्या काठावरती मी रोज येते सांज सकाळी
दे येण्याची हमी तुझ्या नी दीप आशेचे लाव सख्या
मी रोज बघावी वाट तुझी पाऊले वळत नाही घरी
तूझे भेटीस येण्याचे संकेत एकदा तरी दाव सख्या
तुझ्या दिशेचे वेध लागता नजर सारखी भिरभिरते
मन आकंठ बुडते तुझ्यात कळतील हे भाव सख्या
प्रीत तुझ्यावर करूनी जपते जप तुझ्याच नावाचे
व्याकुळ जीवाने कसे सहावे विरहाचे घाव सख्या
मोहिनी निनावे
आनंद नगर, नागपूर
0
4
8
2
9
0



