“शुभेच्छा दान पावलं हो..$$$”; तारका रूखमोडे
आभारसुमने अर्पिताना....!
“शुभेच्छा दान पावलं हो..$$$”; तारका रूखमोडे
आभारसुमने अर्पिताना….!
परवा विषयपोस्ट मध्ये वासूदेवरुपी लोककलाकाराचं सात्विक चित्र पाहिलं नि लेखणी नकळत हायकू समूहात उमटली. सकाळच्या पारी,वासुदेव दारी,हरिनाम बोला..अशी वासुदेवाची हाळी कानी पडताच माई पसाभर धान्य द्यायची.कर सेवा मातापित्याची,पिडा जाऊ दे चंद्रभागेतीरी,दान पावलं हो$$$ अशी हाळी देऊन..मूठभर दानाच्या बदल्यात मोठा ज्ञानार्थ व दैववाद सांगून कुळीचा उद्धार करत,लोकसंगितातून संबंध गावाला जागृत करणारा..अवघे विश्व ब्रह्मसुखी डोलावे,चांगलं कर्म करीत राहावे..असं समाजात चैतन्य ओतणारं, तात्विक अभिव्यक्तीचं विशाल भंडार स्वरूप म्हणजेच वासुदेव..
खरंच..अगदी बेधडक गनिमांच्या गोठात हेरगिरी करून स्वराज्य निर्मीतीत मोठा वाटा असणारा,ग्रामिण जीवन संस्कृतीचा तात्विक भाग असणारा वासुदेव हल्ली मात्र विरळ झालाय..सार्वजनिक स्मरणात लोप पावत चाललेला..म्हणूनच आपल्या संस्कृतीचा गौरवबिंदू असलेली ही पिढीजात कला नामशेष होऊ नये..असं मलाही वाटलं व मी ते अलबत लेखणीतून उतरवलं. आ.परीक्षकांच्या पसंतीस पडलं व सन्मानाचा तुरा शिरोपेचात खोचला गेला..
लेखणीची आवड माझे बाबा साहित्यिक असल्यामुळे त्यांच्या सहवासात आधीपासूनच मला होती.पण मी शिलेदार समूहात आल्यापासून समुहाचे कल्पवृक्ष, मुख्य प्रशासक आ.राहुल सर यांच्या प्रेरणेने लेखणी आकारास येऊन अधिक प्रगल्भ झाली.बाबांची इच्छा होती की एका तरी अपत्याने डाॅक्टर व लेखक/कवी व्हावं.त्यांचं हे स्वप्न माझ्या रुपात थोडसं पूर्ण झालं.व डाॅक्टरचं स्वप्न माझ्या लेकीने पूर्ण केलं.त्यासाठी मी आ.राहुल सरांची आजन्म ऋणाईत आहे.त्यांनीच मला साहित्यिक म्हणून नवी ओळख दिली.
तसेच या प्रवासात आ.पल्लवीताई, आ.प्रिय वैशूताई,प्रिय सविताताई,प्रिय स्वातीताई, प्रिय वृंदाताई,प्रिय शर्मिलाताई,आ.विष्णूदादा ही सर्व भावंडं मिळाली.कधी प्रेमाने आशीर्वाद दिला तर हक्काने रागावलेतही..बरंच शिकायला मिळाले या भावंडांकडून..
सर्व सहप्रशासक,तथा सर्व माझे प्रिय शिलेदार मंडळी आपणा सर्वांच्या प्रोत्साहनाने,प्रेमळ छायेत माझी लेखणी बहरत गेली..आपणा सर्वांच्या ऋणात राहून मजवर शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल आपले हृदयातून आभार व्यक्त करते. हे ऋणानुबंध असेच कायम राहावेत हीच माफक अपेक्षा करते.
तारका रूखमोडे
अर्जुनी मोरगाव जि गोंदिया
सहप्रशासक/परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



