‘दत्तात्रय अहिरे’ यांना आदर्श शैक्षणिक भूषण राज्यस्तरीय पुरस्कार
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
‘दत्तात्रय अहिरे’ यांना आदर्श शैक्षणिक भूषण राज्यस्तरीय पुरस्कार
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास येथे अधिव्याख्याता म्हणून सेवारत
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: (दि २८): दत्तात्रय काशिनाथ अहिरे सर आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये गेली १७ वर्षे अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असून ज्ञानदानाचे कार्य प्रभावीपणे करीत आहेत. प्रोटॉन रायगड जिल्हा शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना कार्यकारिणी सदस्य म्हणून ते प्रभावी पणे काम करीत असून शिक्षक व शिक्षकेत्तरांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत आहेत.
सोमवार दि. २७ जानेवारी २०२५ रोजी प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटीचे विवा कॉलेज, माणगांव – रायगड यांच्या तर्फे सरला देवी मंगल कार्यालय, माणगांव – रायगड येथे त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे व्यवस्थापक राजेंद्र साळवी, माणगाव पोलिस महानिरीक्षक निवृत्ती बोर्हाडे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते – माणगाव सलिम शेख, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष निलेशश थोरे, माणगाव नगरसेविका ममता थोरे, प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन विनया महादेव कडू, विवा कॉलेज – माणगावचे प्राचार्य विवेक रमेश ढेपे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आदर्श शैक्षणिक भूषण राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल त्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व आजी माजी विद्यार्थी यांनी आभिनंदन केले. तसेच त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



