Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

विश्वासाचे नाते

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा- पुणे

0 4 8 2 9 3

विश्वासाचे नाते

मानव हा राग, लोभ मत्सर, प्रेम, विश्वास इत्यादी भावनामय जीवन जगत असतो. या सगळ्यांमध्ये विश्वासाचे नाते खूपच वेगळे आहे. एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला आणि त्याने जर विश्वास घात केला, तर तो माणूस आपल्या हृदयातून कायम बाहेर फेकला जातो. परत आपल्या मनात लवकर जागा रिकामी शक्यतो होत नाही. म्हणून या सर्व नात्याबरोबर विश्वासाचे नाते जे आहे नाते फार काळजीपूर्वक हाताळावे लागते.

एखाद्या माणसावर टाकलेला आपला हा विश्वास तो विश्वासास किती पात्र आहे हे पाहूनच आपला विश्वास त्यावर ठेवावा. काही भोळी माणस अशी असतात की सर्वांवर विश्वास ठेवून विश्वासाचे नाते खूप छान जपत असतात. अशा माणसांना वाटतं की, सगळं जग विश्वासू आहे. कारण ती व्यक्ती स्वतः इतरांनी सांगितलेल्या वर फार लवकर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः एक विश्वास असलेली उत्तम व्यक्ती आहे. त्या व्यक्तीकडे सगळ्यांची गुपित असतात किंवा कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास ते विश्वासच पात्र असतात. ते कोणाचाही विश्वासघात करत नाही. सर्व जग अशा व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास करु शकतात. मग अशी व्यक्ती देखील सर्वांवर विश्वास ठेवते. आणि सर्वांशी अशा रीतीने वागायला लागते.

पण जग साधे नाही. जगामध्ये अनेक प्रकारच्या, विविध स्वभावाच्या व्यक्ती असतात. त्या प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवायचा का? तसे पाहता मला हा प्रश्न कधी आला नाही पण हल्ली जरा हा प्रश्न मला पडायला लागलेला आहे. आपण सर्वांशी छान वागतो. समोरची व्यक्ती आपल्या बरोबर देखील छानच वागतो असे वाटते अरे हा खरच किती छान आहे.पण इथेच आपला विश्वास तोडला जातो… कारण आपण काही गोष्टी आपला म्हणून त्याला सांगतो पुढे तो त्याच गोष्टी पुढे इतरांना सांगत सुटतो. मग आपण त्याला आपल्या काही गोष्टी विश्वासाने त्याला सांगतो तो पुढे नको तिथे ते सांगतो हाच तो विश्वासघात!

आणि मग ज्याने विश्वासघात केलेला आहे, त्याच्याबद्दल आपली मतं बदलायला सुरुवात होते. मग तो कितीही जवळचा असू दे, लांबचा असू दे तरीसुद्धा आपली मत बदलायला सुरुवात झाली की परत आपल्या मनात त्याची प्रतिमा चांगली होण्यास खूप अवधी लागतो. एखाद्याच्या मनात शिरायला खूप वेळ लागतो. पण त्याच्या मनातून उतरायला एक क्षण पुरेसा होतो. एखाद्याच्या हृदया अंतरी जाऊन बसावे. विश्वासाचे नाते मनापासून जपावे.

असे हे विश्वासाचे नाते आहे.
विश्वासाचे नाते दृढ करावे
विश्वास संपादन करून
मानवाच्या अंतरी एकरूप व्हावे…
कोणाला फसवू नये
आपणही प्रामाणिक रहावे
जनमाणसात नाव कमवावे
विश्वासाचे नाते दृढ करावे….

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे