0
4
8
2
9
0
दलितांचा राजा
अपमानाचे शल्य बोचरे
जातीभेदाचे उरी निखारे
अन्यायाचे शर जळणारे
हळवे काळीज कुरतडणारे
अज्ञानाच्या घनगर्द तिमिरी
प्रकटली प्रकाशरेषा हसरी
दलितांचा राजा जन्मे धरेवरी
समाज उध्दारक इथे अवतरी
दु:खितांचे ते अश्रू पुसले
शिक्षणाचे मूल्य पटवले
चवदार तळे खुले केले
आत्मभानची जागृत केले
घटनेचे शिल्पकार जाहले
न्याय, शिक्षण स्वातंत्र्याचे
समानतेचे बीज मनी पेरले
स्वप्न उरी जनकल्याणाचे
चैत्यभूमी ही ऊर्जादायिनी
अनुयायांचा मेळा जमूनी
प्रणाम त्रिवार अनन्यभावे
महामानवा मनी स्मरूनी
वृंदा(चित्रा)करमरकर सांगली
0
4
8
2
9
0



