Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

मोबाईलची व्यसनाधिनता कशी थांबणार…?

अल्पवयीन मुलांवर पालकांचे कमी पडलेले संस्कार

0 4 8 2 9 4

मोबाईलची व्यसनाधिनता कशी थांबणार…?

अल्पवयीन मुलांवर पालकांचे कमी पडलेले संस्कार

एक आठ वर्षाचा मुलगा होता. त्याने आपल्या आईचा कपडे बदलताना व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ जेव्हा त्याच्या मोठ्या बहिणीने पाहिलं तेव्हा ती थक्क झाली. त्याच्या आईने त्याला खूप मारलं. पण इथे आपल्या मुलांना दिलेले संस्कार कमी पडतात. आपण आई वडील लहानपणापासूनच मुलांच्या हातात मोबाईल देतात. पूर्वी मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टी दाखवल्या जायच्या. पण आता अश्लील गोष्टी, पॉर्न व्हिडिओ दाखवले जातात. त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टींचा मुलांच्या मनावरती परिणाम होतो. अल्पवयीन मुलं जास्तीत जास्त रील्स बघण्याचा आनंद घेतात. काही वेळेला इतके घाणेरडे रिल्स असतात की ते रिल्स त्या मुलांच्या मनावर ती परिणाम करतात. त्या मुलांची बौद्धिक क्षमता आहे ती कमकुवत करतात. अभ्यास झाला की मुलं लगेच हातात मोबाईल घेतात.

लहान लहान मुलं देखील वेडेवाकडे डान्स करून आपले रिल्स तयार करतात. जे वय अभ्यास करण्याचे असते, जीवनामध्ये प्रगती करायचे असते, त्या वयामध्ये मुलांना मोबाईलच वेड लागतं. मोबाईलमध्ये जे पॉर्न व्हिडिओ असतात. ती छोटी मुलं मन लावून सरस पाहतात. पॉर्न व्हिडिओ ही आता सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत. रिल्समध्ये सुद्धा पॉर्न गोष्टी दाखवल्या जातात.त्याचा परिणाम मुलांच्या डोक्यावरती भरपूर झालेला आहे.त्यामुळे मुलं चिडचिड करतात, अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत. सर्वात महत्वाचे mobile मुले मुले आळशी झाली आहेत.मुलांना वाईट व्यसन लागलेल आहे.

काही सोळा, सतरा वर्षाची मुलं दारू, सिगारेटच्या व्यसनात आहेत. दहावी अकरावीच्या मुली आता प्रेग्नेंट होत आहेत. एखादी गोष्ट मुलांनी पाहिली तर ती आपण करावी अशी एक त्यांच्या मनात धारणा निर्माण होते. ती गोष्ट करण्याचा प्रयत्न ती लहान मुलं करतात. मुलं आई-वडिलांना उलट उत्तर देतात. देवधर्म त्यांना आवडत नाही. समोरच्या वडीलधारी माणसाशी कसं बोलायचं याचं ज्ञान नसतं. इथे आई – वडिलांचे संस्कार कमी पडतात. मुलांना लहानपणापासून मोबाईल सक्ती केली पाहिजे. मुलगा मोबाईलवर काय बघतो याकडे आई-वडिलांनी लक्ष ठेवले पाहिजे. मोबाईलचा परिणाम म्हणजे, हल्लीचे मुले आई-वडिलांना वेळ देत नाहीत. आई-वडिलांशी बोलण्याचे टाळतात. मोबाईलच हा त्यांचा मित्र झालेला आहे.

मोबाईल मधून देखील खूप काही गोष्टी शिकण्यासारखे आहेत. पण मुलं वाईट गोष्टी लवकर शिकतात. काही वेळेला 35 वर्षाची लेडीज यांच्याशी चॅटिंग करतात, मुले मग त्यांच्या प्रेमात गुंतली जातात. आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांना ध्यानधारणा करणे, मंत्र जप करणे, नामस्मरण करणे भगवद्गीता रोजच्या रोज दोन पानं मुलांना वाचायला देणे या गोष्टी आई वडिलांनी मुलांना शिकवायला पाहिजे. हे स्पर्धेचे युग आहे. तुम्ही मेहनत कराल तर तुमची बौद्धिक क्षमता उच्च लेवलची असेल. तुमच्यावर संस्कार असतील तर तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकता. नाहीतर भरपूर शिक्षण घेऊन देखील मुलंही बेरोजगार राहिलेली आहेत अशी समाजाची अवस्था झालेली आहे. उत्तम नागरिक जर मुलांना घडवायचं असेल तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. मुलांनो मोबाईलचा वापर तुम्ही जरूर करा, पण ज्या वयात आई-वडिलांशी सुसंवाद साधायचा वेळ असतो त्या वेळेला आई-वडिलांशी सुसंवाद साधा. आई-वडिलांना वेळ द्या. त्यांच्यावर प्रेम करा. संस्कारक्षम मुलेच देशाचे भवितव्य आहे.

लेखिका तृप्ती पाटील
मुंबई

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे