आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध
ठगबाजी
विष्णू संकपाळ जि. छ. संभाजीनगर
0
4
8
2
9
3
ठगबाजी
येथे भुकेल्याने चोरी केली
तर ते सर्रास घोर पाप आहे
माजलेल्यांच्या लबाडीला
सांगा कोणते माप आहे…? //
नेत्यांच्या अतिक्रमणावर
नियमितपणाची छाप आहे
मात्र गरीबांच्या झोपड्यांना
पद्धतशीरपणे चाप आहे… //
येथे निष्ठावान एकलव्याच्या
अंगठ्यालाच काप आहे
मात्र दर्जाहिनांच्या पाठीवर
कौतुकाची थाप आहे… //
कष्टकऱ्यांच्या वाट्याला
येथे अहोरात धाप आहे
मनमानी सत्ताधाऱ्यांचा
सांगा कोण बाप आहे… //
सर्वसामान्यांच्या जीण्याला
असा ठगबाजीचा शाप आहे
अन् लाचखोरी बेईमानीचा
जेथे जावे तेथे ताप आहे…. //
विष्णू संकपाळ
जि. छ. संभाजीनगर
========
0
4
8
2
9
3



