0
4
8
2
9
4
भाकरीचे गाणे
दिव्यांनी सांगू नये, प्रकाशाचे गाराणे।
कधीच अंधाराने, नाही मारीले ताने।।
मायबाप सोडून, का पुजता देव्हारे।
अजूनही दर्शन ,दिले कारे देवाने।।
श्रीमंती तुझी तुला, लखलाभ होऊ दे।
गरीबीत भला मी, आहे मोठ्या दिलाने।।
उधळ खुशाल तू ,गुलाब मोगर्याना।
नहातो असाच मी, सर्वांग सुगंधाने।।
भरजरी वस्त्रात, मिरवता कशाला।
लाज राखून आहो, माझ्याच चिंदकाने।।
मैफिल जिंदगीची, धुंदीत रंगतांना ।
गातो ओठात तेव्हा, या भाकरीचे गाणे।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.
0
4
8
2
9
4



