
0
5
7
4
4
8
माझी पाककला: शेवलाडू
साहित्य : दोन वाट्या चना डाळीचे पीठ, दोन वाट्या साखर, वेलची पूड, पाव चमचा मीठ, तळण्यासाठी तूप इत्यादी.
कृती : चनाडाळीच्या पीठात किंचित मीठ घालून पाण्याने गोळा भिजवा. तुपात जाड शेव तळून घ्या. गरम असतांनाच हाताने बारीक करून घ्या. साखरेचा दोनतारी पाक बनवून त्यात बारीक केलेली शेव घाला. छोटे छोटे लाडू वळा. हे लाडू बुंदीच्या लाडवासारखे लागतात.
वाढप- ही रेसीपी तीन व्यक्तीस पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=======
0
5
7
4
4
8



