0
4
8
2
9
7
मन वेडे
मन वेडे माझे वाट तुझी का पाहते?
उदास होता जरासे अश्रू का वाहते?
नजरानजर होताच ते का खुलते?
नशा चढल्यावाणी ते का झुलते?
क्षणिक तुझ्या स्पर्शाने का मोहरते?
दिसताक्षणी म्होरं का असे बहरते?
मन वेडे जरी तूच का भासतेस परी?
तू न दिसता डोळ्यातून वाहती सरी
मन वेडे माझे तुझ्यात कसे गुंतले?
मुर्दाड या मनात चैतन्य तू फुंकले
गुरफटलेल्या या मनाला दे तू विसावा
तुझ्याविना शून्य समजू नको दिखावा
मन वेडे म्हणून करू नकोस मला दूर
विरहात सखे तुझ्या फुटेल माझा उर
विरहात सखे तुझ्या फुटेल माझा उर
श्री.संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
0
4
8
2
9
7



