Breaking
ई-पेपरकवितानागपूरबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

खबरदारी

राजश्री मिसाळ ढाकणे

0 4 8 2 9 3

खबरदारी

गर्द दाट वृक्ष कुठंच दिसेना
मिळेना आता थंडगार छाया
भर उन्हात चालणाऱ्याला
मिळेना वृक्षांची आता माया…

उन्हाळ्यात सुद्धा नद्या नाले
पूर्वी तुडुंब भरलेले दिसायचे
उन्हाच्या काहिलीने जनावरे
मनसोक्त पाण्यात बसायचे…

जंगल दिसतंय चित्रात फक्त
डोंगर उघडा बोडखा झाला
आंब्याच्या पानाआड कोकिळ
आवाज कुहूकुहू नाही राहिला…

बगळ्यांची शाळा बंद पडून
दिसेना करकोचाचा तो थवा
पर्यावरण ऱ्हास आतातरी
मानवा तू थांबवायला हवा….

वृक्षारोपण नि संवर्धनाची
सर्व मिळून घेऊ खबरदारी
ठेवू श्वास मोकळा निसर्गाचा
निसर्गाची होईल पूजा खरी…

राजश्री मिसाळ ढाकणे
ता.जि.बीड
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे