Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

आचरण

सविता धमगाये जि नागपूर

0 4 8 2 8 4

आचरण

मनोमनी ठसते तेच
शुद्ध सुसंगत आचरण
जग चालते मागे त्याच्या
पुजनीय असती तव चरण

बोलतो तैसाच चालतो
आदर्श व्यक्तीमत्व जगतो
आभा पाहता दिपती डोळे
आशिर्वाद त्याचा मागतो

राग असे बुडबुडा जसा
सदैव शांत चित्त दिसे
स्मरताच पहाटे येई स्फुर्ती
आंतर हृदयी तोच वसे

वाणी मधूर स्निग्ध जशी
खळखळ झरा वाहे वनी
सहज वागणे सहज चालणे
प्रकाश शांतीचा भरे मनी

शांत सरोवर मुखकमलावर
पाहताच हृदय शांत वाटे
झुकता नजर आदराने तिथे
आनंदी भाव मनात दाटे

सविता धमगाये
जि नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे