
0
5
2
4
6
3
गुरू
गुरु असे पंचप्राण साऱ्या जीवांचा
ज्यांच्या कृपा दाने चाले
खेळ प्रपंचाचा.
गुरु असे कोण ?
यास नसे काही थांग,
माय बाप,बंधू सखा
हेही असो गुरुस्थानी
यत्न करा फेडाया त्यांचे पांग
गुरु रूप कधी सान कधी थोर,
सन्मान मात्र व्हावा त्यांचा निरंतर.
पडता प्रश्न काय बरे वाईट,
तिढा सोडवाया गुरु उपदेश आठवावा नीट
शाळेतील गुरुजी असे लेकरांचा पाठीराखा,
जग जिंकावे शिष्याने
घेऊ नये मिथ्या आणा भाका.
एक विचार करता सायास
निसर्ग ची सर्वांचा गुरु
सारं जग त्याचे दास,
साऱ्या मोह माया
सगळे भवबंधाचे पाश.
सोमा म्हणे चित्त ठेवा गुरु ठायी,
या जन्मी होता येईल का उतराई..
सोमकांत साखरे (सिद्धेश्वर)
चिखली, जि. बुलढाणा
0
5
2
4
6
3



