Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

लालबिंदू

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

0 4 8 2 9 0

लालबिंदू

मनुष्याचे जीवनच आहे
आहे लालबिंदू श्रेष्ठतम
लालबिंदूची महती किती
किती वर्णावी उत्तमोत्तम ॥

पाण्यापासुनी बनला तरी
तरी रूप रूधिराचे असे
मरणासन्न व्यक्ती रक्ताने
रक्ताने जीवनी पुन्हा दिसे ॥

चार गटातली विभागणी
विभागणी जीवदान देई
सर्वदाता ओ हा रक्तगट
रक्तगट पुण्यवान होई ॥

लालबिंदू बहुतांचे प्राण
प्राण वाचविण्या कार्यक्षम
रक्तदान करूनी आपण
आपण काया ठेवू सक्षम ॥

भांडुनी लढुनी लालबिंदू
लालबिंदू वाया घालविती
रक्तदान करूनी आयुष्य
आयुष्य सज्जन घडविती ॥

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
उमरगा जि.धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे