Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध

गर्वाचे घर खाली

प्रा.दिनकर झाडे गडचांदूर,जि. चंद्रपूर

0 4 8 2 9 7

गर्वाचे घर खाली

अहंम कशाचा तुला एवढा
घेऊन आलास का अमरत्व ?
ना चिरकाल टिकेल सौंदर्य
ना उरणार कसले सत्व .

माज कशाचा आला तुजला ?
चालला हीन लेखीत सर्वा
येईल वेळ जेव्हा तुजवरी
करील कोण रे तुझी पर्वा ?

बाळगू नको बेगडी अहंम
ना करु कुणाची उगीच चेष्टा
होईल गर्वाचे घर खाली
ठेव माणुसकीवर निष्ठा

एकटाच आला एकटाच जाशी
ना येईल तुझ्या कुणीच सोबत
अन् कशाला अकडतोस इतका
येईल एकदिनी तुजवरी नौबत

ससा कासवाची गोष्ट राज्या
लक्षात आहे ना तुझ्या भली
अहंकाराची शिग भरता
होते गर्वाचे घर खाली

प्रा.दिनकर झाडे
गडचांदूर,जि. चंद्रपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे