Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

स्वरगंगा… गाणे तराने

अनिता व्यवहारे

0 4 8 2 9 7

स्वरगंगा… गाणे तराने

दुखी मन मेरे सून मेरा कहना |
जहा नही चैना वहा नही रहना..|

“मन”… ज्याचा कधीच कुणाला थांगपत्ता लागत नाही. कुणाला ते कधी दिसलही नाही अशा या मनाशी आपण कायम संवाद साधत असतो. सुख-दुःखाचा प्रत्येक क्षण त्याच्याशी शेअर करताना स्वतःला धीर देताना याच मनाला आपण आपल्या तालावर ही नाचवतो. सन 1956 साली प्रदर्शित झालेल्या ‘फंटुश’ या चित्रपटातील हे गीत गीतकार ‘साहीर लुधियानवी’ यांनी आपल्या दर्दभऱ्या आवाजातून साकारल असून त्याला संगीतबद्ध करणारे संगीतकार ‘सचिन देव बर्मन’ यांच हे गीत प्रत्येक मना मनाशी जोडले गेलेलं दिसून येतं.

नेहमीच तरुणाईला आपल्या आवाजावर तिर करायला लावणारे ‘भारतरत्न’पुरस्काराने गौरवले गेलेले गायक किशोर कुमार यांनी मात्र या गीताला आपल्या हृदयातील भाव एकवटून भावस्पर्शी आवाजात स्वरबद्ध केलं… आणि ये हृदयीचे ते हृदयी नेऊन पोहोचवलं.. ‘दुखी मन मेरे सून मेरा कहना’. जिथे मन रमत नाही, मनाला सुख शांती नाही तिथे मनाने का थांबावं? हे जग स्वार्थी आहे तिथे… ‘दर्द हमारा कोई न जाने, अपनी गरज के सब है दीवान’.

ज्यांना दुसऱ्यांच्या मनाची कदर करणे दुसऱ्याच्या मनाला जाणून घेता येत नाही. अशा परक्या लोकांनी कधी आपला देश आपला मानला नाही त्यांच्या समोर कितीही रडलो तरीही दगडाच्या काळजाला पाझर फुटणार नाहीच नाही.. पण, ‘लाख यहा झोली फैला ले, कुछ नही देंगे इस जग वाले.’ आणि आपली झोळी मात्र रिकामीच राहिल. तेव्हा हे मना, जरा ऐक माझे आपण इथे राहायलाच नको . शेवटी ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ तो एकटाच आलेला आहे, आणि त्याला एकट्यालाच जायचं आहे. हे जग त्याच्यासाठी मिथ्या आहे.जरी येथे माणसांच्या कितीही जत्रा भरत असल्या तरी मनासाठी मात्र… ‘अपने लिए कब है ये मेले’.

हे जग इथली माणसं कायम दुसर्‍याच्या आयुष्याशी खेळ करीत, त्याला खेळवत त्याची झोळी दुःखानेच भरणार आहेत. तेव्हा अशा ठिकाणी राहण्यापेक्षा ही दुनिया सोडून दुसरीकडे जाऊ या.! अशी मनाची समजूत घालणार हे भावस्पर्शी गीत आपण नक्कीच ऐकावं. जरी हे गीत ऐकून मन दु:खी झालं तरी स्वतःच्या मनाची समजूत कशी घालावी हे तरी आपल्या मनाला नक्कीच समजेल. असे ‘ओल्ड इज गोल्ड’ असणारे गीत… ज्या मनावर तुम्ही अधिराज्य गाजवता ते मन तुम्हाला समजावून घेईल आणि तुम्हाला या मोहमयी दुनियेतून आनंदी जगात नक्कीच घेऊन जाईल. ‘हे मना, जरा थांब ना……!’ म्हणत त्याला हे गीत जरूर ऐकवा…!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहिल्यानगर
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे