राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद
हजरत बाबा ताजुद्दीन महाविद्यालयात आयोजन
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : (दि २६) ताजाबाद शरीफ येथील हजरत बाबा ताजुद्दीन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात २३ व २४ मार्च रोजी आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषदेचा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष यांनी केले तसेच उच्च शिक्षण सह संचालक डॉक्टर संतोष चव्हाण शहादा एज्युकेटिव्ह सोसायटी नागपूरचे अध्यक्ष जन्नत अब्दुल सलीम अब्दुल जब्बार व इतर पदाधिकारी यांनी केले.
देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही परिषद ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष यांचा संगम ठरली. मानविकी, सामाजिक शास्त्रे, वाणिज्य, व्यवस्थापन आणि शुद्ध विज्ञान या विविध शाखांतील समकालीन विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाश्वत विकासासाठी नवोन्मेषी विचारसरणी विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. विविध तज्ञांनी आपले संशोधन सादर करतांना बदलत्या जागतिक परिस्थितीत शिक्षण आणि संशोधनाची भूमिका अधोरेखित केली.
या परिषदेचे आयोजन हजरत बाबा ताजुद्दीन महाविद्यालय आणि अशोक मोहरकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, मारिया कला आणि विज्ञान महाविद्यालय तसेच उम्मे- सलमा कला आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर अध्यक्षता म्हणून उपस्थित होत्या. समारोप सोहळ्यात उत्कृष्ट संशोधनपत्रांना गौरविण्यात आले. परिषदेमुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी खुली झाली असून शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना सहभागींकडून व्यक्त करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शकील अब्दुल सत्तार यांनी प्रास्ताविक भाषण केले त्यानंतर शोध निबंध जनरल पुस्तकाचे विमोचन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली.



