Breaking
अहमदनगरई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

लग्न : बंधन की कोंदण

अनिता व्यवहारे

0 4 8 2 9 0

लग्न : बंधन की कोंदण

कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान
वाजंत्री बहु गलबला न करणे
लक्ष्मीपती मंगलम शुभमंगल सावधान!!
आठवल्यात ना या ओळी. आपल्या प्रत्येकाच्या लग्नातही आपण मंगलाष्टक ऐकलेली आहेत आणि ती ऐकूनच आपण सावधान होतो बहुदा. पण सावधान या शब्दाचा नेमकं गुढ मात्र अजूनही मला उलगडलेलं नाही. अर्थात,’लग्न झालं की सावधान राहणं आलंच..!’ कारण हे जरी शुभमंगल असलं तरी, कधी कधी लग्न हे एक प्रकारचं बंधन ही असतं. फार वेळा ते कोंदण असतं ही गोष्ट निराळी.. कोंदण म्हणजे काय? तर एखाद्या अलंकारात हिरे मोती बसवण्यासाठी तयार केलेलं घर. अर्थात या कोंदणाला ही मर्यादा असतात. म्हणजे मर्यादित जागेत ते बसवावे लागतात. तसं बंधन म्हणजे सुद्धा मर्यादा आणि अशा मर्यादा असतील तरच आपलं जगणं सुंदर होतं.

ही बंधनं जर आपण घालून घेतल तर ते कोंदण आणि आपल्यावर कोणी लादल तर ते बंधन. आपल्या विवाह व्यवस्थेचा विचार करता आजही मुला-मुलींना जोडीदार निवडण्याचे फारसं स्वातंत्र्य दिलं जात नाही. लग्न झालेल्या स्त्री पुरुषानं कसं रहावं? कसं वागावं? हे सासरची, आजूबाजूची मंडळीच ठरवतात. स्त्रियांच्या बाबतीत पाहिलं तर तिला स्वतःचं असं अस्तित्व तर सोडाच पण नाव सुद्धा टाकावे लागतं. तिच्या मतांची, तिच्या अस्तित्वाची जिथे कुचंबणा होते,तिथे लग्न हे बंधनच म्हणावं लागेल. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नाला फार मोठे महत्त्व आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे नव्हे तर दोन कुटुंबाचं मिलन असतं. ‘सात जन्मांची साथ’ असे म्हणून लग्नाच्या नात्याला अत्यंत पवित्र मानलं जातं.लग्न म्हणजे केवळ सामाजिक परंपरा नसून, लग्न म्हणजे एक समर्पण…!

लग्न केवळ दोन व्यक्तीचं नातं नसतं तर दोन कुटुंब, दोन विचार, दोन जीवांनी एकत्र चालण्याचा एक नवा प्रवास असतो. बंधन असलं तरी ते प्रेमाच्या धाग्यांनी विणलेलं असेल तर ते बोचणार नाही. कोंदण जरी हिऱ्या मोत्यांचे नसलं तरी ते भावनांचं असलं तर कशावरही मात करू शकतं. फक्त इथे अस्तित्वा बरोबर स्वत्व जपण आवश्यक असतं . ‘लग्न बंधन असले तरी ते विश्वासाचं असावं, लग्न कोंदण असलं तरी ते प्रेमाने उजळावं’.

‘लग्नात जसं कोंदण, तसं बंधनाला ही महत्त्व द्यायला हरकत नाही’. स्त्री पुरुष समानता ही देखील लग्नाच्या यशस्वी होण्यातला एक महत्त्वाचा मुद्दा.चंद्रावर जाणारी आपण माणसं पण आजही स्त्रीला तिच्या पातिव्रतेच्या नावाखाली तथाकथित संस्कार तिच्यावर लादले जातात. मंगळसूत्रापासून ते कर्ण फुलापर्यंत, डोक्याला टिळा लावण्यापर्यंत तिला बंधनात रहायला भाग पाडले जातं. लग्न सिद्ध करून दाखवायचं तर ते आभूषणातूनच सिद्ध होतं. हरतालिकेपासून वटसावित्रीपर्यंत सारं काही तिच्याच माथी मग का नाही वाटणार तिला हे बंधन.?

प्रत्येक स्त्री जेव्हा वटसावित्रीचं व्रत करते, तेव्हा मनाला असं जाणवत की, ती जेव्हा वडाला दोरा बांधते ना.,!! तेव्हा तो वड समजून घेत असेल की, हिला तिच्या नवऱ्याने लग्नानंतर जसं बांधून टाकलंय तसं त्याला मी कसं आणि कशानं बांधायचे ते सांगण्यासाठीच तर ती मला दोरा बांधत नसावी.. असो.. हा झाला विनोदाचा भाग. तरीही मला माझ्या विषयाकडे पुन्हा यावसं वाटतं की लग्न हे बंधन न रहाता ते कोंदणचं व्हाव..
हर पत्नी प्रेमिका हो सकती है |
हर पती प्रेमी हो सकता है|
हर मकान घर हो सकता है|
तो हर बंधन कोंदण क्यूँ नही हो सकता|
जेव्हा पती पत्नी बाह्यांगानेच नव्हे तर आचार विचाराने Made for each other ही संकल्पना साकारतील, एकमेकांच्यात मैत्रीचं नातं संपादन करतील, तेव्हाच ‘जी वनाची नवी गाथा उलगडेल. हृदयाची नवी वाटचाल सजेल, लग्न हे बंधन की कोंदण हा प्रश्न ही सुटेल आणि ते लग्न म्हणजे राहील फक्त सहजीवनाचा सुवर्ण आभास.!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि.अहिल्यानगर
========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे