Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील काव्यरचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🥀विषय : चिंतातूर🥀*
*🍂बुधवार : २१ / जानेवारी /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चिंतातूर*

अनेक वर्ष वाट पाहिली बाई
आता तरी नवरा वागेल नीट
पण हाय रे दैवा काही फरक नाही
वागण्यात जसा होता तसाच धीट…..

नोकरीला जायचं, सिगारेट ओढायची
घरी येताना दारूची बाटली आणायची
दारात पाऊल पडताच आरडाओरडा
धांदल खूप उडायची बायकोची…

चिंतातूर कुटुंब,सासू सासरे
फक्त विचार सतत करत राहायचे
दुसरे काही करू शकत नव्हते
मात्र आपल्या सुनेची बाजू घ्यायचे….

40 वर्ष लग्नाला आता झाली
बायकोला मुलांचा आधार मिळाला
नवरा आता चोरून सारे करतोच
त्याचा पराक्रम सर्वांनाच कळला…

करून सवरून नामानिराळे राहतात
हळूच कोण येत नाही न हे पाहतात
दारूची बाटली तोंडाला लावतात
स्वतःचीच फजिती करून घेतात…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

का! होऊन बसू मी चिंतातूर
का! करू स्वतःचच जगणं बेसूर
का! माजवू विचारांचा महिषासुर
नको विचारांचा डोक्यात महापूर…
चिंता बुद्धीला मारक
चिंता करी चतुराईला गारद
चिंतेने स्वतःचीच होईल पारध
आत्ममग्नतेची चिंतेने घुसमट…
सोडून चिंता…
आनंद सौंदर्य शोधते
शोधते सत् सौंदर्य जगण्याचा
सौंदर्य जपते अविरत श्रम, कर्तुत्वाचा..
जपते माणूसपण.. माणुसकी
बोलते स्पष्ट, सत्य सदा
चिंतामुक्त आनंदी राहून
हसते मी सदा..खदाखदा…

*सौ सुरेखा कोरे, नागपूर*
*जिल्हा नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

सभोवताली क्षण आनंदू
तरी का मन हुरहुरु
मन कसे चिंतातूर||

खुदकन हासते ओठ
छातीत भरते कळ
डोळ्यात गंगेचा पुर
मन कसे चिंतातूर||

धावते लहरत लहरत
मागे वळून हिरमुसूत
कशासाठी उगाच रुसून
मन कसे चिंतातूर||

रममाण हो विश्वात
तुझपास रत्न खास
पारसाशी त्यास घासून
मन कसे चिंतातूर||

भविष्यकाळ खुणावत
नको राहू उगाच दु:खात
सुख येईल पदरात
मन नको करु चिंतातूर||

*रंजना राहूल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मो.जि.गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

व्यवस्थेचा माणसाला,खूप होत त्रास आहे।
चिंतातूर समाजा या,मुक्तिचीच आस आहे।।

दरवळत नाही येथे सुगंध कधी फुलांचा।
कुजली मानसिकता , दुर्गंधी वास आहे।।

रक्ताच्या चिरकांड्या उडतात व्याभिचारी।
अंध न्याय देवतेला कायदेही दास आहे।।

भोगतात शेतकरी,आणीबाणी दुष्काळाची।
कर्ज फेडता फेडता,घेतो गळफास आहे।।

भ्रष्टाचारी प्रव्रुतीची,लोकशाही कोणती ही।
पैशापुढे झुकलेले , पुढारी सर्हास आहे।।

स्वार्थानी बरबटले,रक्ताचे पिपासू झाले।
बघा घरोघरी कसे ,भयानक डास आहे।।

नितीमुल्य संस्काराची,जरी करतेय होळी।
तरीही उदोउदो करी, जाती धर्मास आहे।।

कोणास ना कळेना ,आयुष्य कसे जगावे।
मरणप्राय यातना ,चालू फक्त श्वास आहे।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा. जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चिंतातूर*

प्रत्येकजण कोणती तरी
काळजी वाहतांना दिसतो
समस्या, अडीअडचणीचे
ओझे डोईजड वाहत असतो

कुणा दोन वेळची भ्रांत
पोटाची खळगी भरण्याची
कुणाला पोटाची समस्या
वाढलेले कमी करण्याची

उमेदवार चिंतातूर राहतो
मतदान निकाल लागे जोवर
विकासाचे प्रश्न ऐरणीवर
जनताही चिंतातुर तोवर

परीक्षेत आणि परीक्षेनंतर
विद्यार्थी चिंतातुर दिसतात
निकाल कसा लागेल नेमका?
प्रश्न समोर उभे असतात

शेतकरी चिंतातुर बिचारा
घाम गाळून धान्य पिकवतो
पिकवलेल्या मालाला भाव
योग्य येईल का प्रश्न पडतो

चिंतामुक्त इथे कोण आहे ?
शोधून ही सापडेल का हो
कमीअधिक प्रमाणात मात्र
चिंता सतावत नाही का हो?

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

अर्ध्यावर डाव मोडून, मृत्यूला झालास फितूर
कशी जगू तुझ्यावाचून, मी अहोरात चिंतातूर//

विस्फारून व्याकूळ नजरा, न्याहाळते दूरदूर
येशील कुठूनही अवचित, ही अनामिक हूरहूर//

धूसर तुझी आशा, काळजात माजतेय काहूर
संयमाचा बांध फुटतो, रोखू कशी अश्रूंचा पूर//

कुठे उणी पडलेय मी, झाला तरी काय कसूर
सूनी झालीय जीवनमैफिल, भंगलेत सारे सूर//

होते कधी राधा तुझ्या,मीच कृष्णलीलेत चूर
आजही तूच या ह्रदयी, मी बनले मीरा आतूर //

सरली सारी आसक्ती, बदलून गेला माझा नूर
आता उरले विरक्त विराणी, शापित प्रित मधूर//

पूरी करण्या कहानी, पूनर्जन्म ही मला मंजूर
सख्या तुझ्या प्रतिक्षेत, जळेन होवूनी कापूर.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

सखया तू भेटलास मला
जाग चांदण्यास आली
तुझ्या प्रीतीच्या सागरी
अभिसारिका मी नाहली

सुखे सारी मम अंगणी
जन्म कृतार्थ जाहला
सप्तपदी चालताना मी
आनंदाचा तो सोहळा

तुझा अंकुर मम उदरी
चाललास तू सीमेवरी
आसू – हसू नयनांत या
निरोप दिधला तुज परी

किती दिन,वर्षे नी माहिने
दिवसा मागून दिवस सरले
परी नच तू घरी परतला
मातृत्व परी मी ल्यायले

मम मन झाले चिंतातूर
नेत्रांतूनी अश्रूंचे पूर
परी सोडला नाही धीर
जीव तव भेटीस अधिर

ध्येय एकची रे समोर
जपायचाच रे हा अंकुर
किती कष्टले दु:ख साहले
मम स्वप्नालाच येई बहर

बाळ मोठा होई आपला
शिकूनिया शहाणा झाला
तो देश सेवक बनला
सैन्यातची भरती जाहला

अजून मम मनी आस
येशील सखया परतून
आशेचा तुटू दिला न दोर
तुझे स्वप्न पाहती नयन

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

नाही हाताला काम, नाही खिश्यात दाम,
भविष्याच्या स्वप्नांची,होतेय धुळधाण…
वणवण फिरून,फुटतो अंगी घाम,
अंधारल्या जीवनी, उड्या मारी सैतान…१

रंगविलेली स्वप्ने, होतेय मातीमोल,
सत्ताधीशांचा वाजे, स्वार्थ प्रेरीत ढोल…
युवांच्या आयुष्याचे, भाग्य ठरती फोल,
जगण्याची प्रेरणा, अंतःकरणी अबोल…२

फाटक्या संसाराला,लावू किती ठिगळ,
कसे जगावे सांगा?, किती सोसावी कळ…
कुणी नसे कुणाचे,असे सत्तेचा खेळ,
भोळ्या प्रजेचा चाले,कसा कसा रे छळ…३

दुःख ठोकता तळ,जीवास जळजळ,
असह्य या वेदना, अश्रूंची खळखळ…
*सुधाकरा* मनाची, सांगू कुणा खबर,
*चिंतातूर* मनास, जगणे अवघड…४

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

कपाळावर काळरेषा कोरल्या,
तरी दृष्टीनं आकाश धरलं,
अश्रूंच्या उंबरठ्यावर उभी
तिने मौनालाच शस्त्र केलं….

नात्यांची राख अंगाखांद्यावर,
जबाबदाऱ्यांची धग उरी,
स्वप्नं विरघळली रात्रीत,
तरी आशेची पहाट उरी….

कधी उपेक्षेचा शीत स्पर्श,
कधी विधीची निर्दय मुद्रा,
संयमाच्या दीपशिखेवर
ती सावरणारी प्रत्येक व्यथा…

वादळांचा गर्जन काळजात,
तरी पाऊल न कधी चुकलं,
बुद्धी, धैर्य, काळजीपूर्वक
नशिबालाही तिने वळवलं….

स्वतःच्या वेदनांची भाषा
ती जगाला कधीच देईना,
कारण तिच्या शांत श्वासात
अनेक जीवनं सावरलीना….

चिंतातूर आहे ती म्हणून
अवहेलना करू नका रे,
तिच्या स्थिर मौनाच्या मुळाशी
अखंड शक्तीची बीजं धरे….

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
*चिंतातूर*

समजतंय का तिच्या
अंतर्मनाला कधी कुणी
रांधा वाढा उष्टी काढा
हेच तर तिच्या जीवनी

चिंतातुर मन तरी हसणं
तिन चेहेऱ्यावर फुलवते
फाटका संसार तिचा तरी
कुटुंबाला आनंदी ठेवते

काटकसर करून पैसा
पैसा जोडून तिन ठेवते
मुलांच्या भविष्यासासाठी
कधी उपासही तिन करते

चिंतातूर असुनही न दाखवता
मुलांच्या स्वप्नासाठी ती झटते
लेकरासाठी या माय माऊलीच
काळीज तीळ तीळ तुटत असते

घराला घरपण तिच्यामुळेच
त्यात प्रेम जिव्हाळाही ओतते
गृहिणी,आई,भगिनी,चहचारीणी
किती किती रूपे तिच्यात दिसते

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😟🌀😟➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे