चार ऋतू आणि वेळेचे व्यवस्थापन
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे
चार ऋतू आणि वेळेचे व्यवस्थापन
हो! बरोबर वाचलेत उन्हाळा, हिवाळा,पावसाळा हे तीन ऋतू जलचक्राचे आहेत. पण जिव्हाळा हा माणुसकीचा एक ऋतूच आहे. ‘जिव्हाळा हा मानवाने निर्मित केलेले उत्तम नाते आहे’. प्रत्येक मानव हा आपल्या स्वभावानुसार बारमाही सुद्धा हा जिव्हाळा ऋतू आनंदाने जपून ठेवू शकतो. या ऋतूमध्ये मात्र आयुष्यात असे लोक जोडले जातात की ते तुमची सावलीसारखी काळजी घेतात. तुमच्या मनाचा आरसा बनतात. ‘आरसा कधीही खोटे बोलत नाही. आणि सावली आपली साथ कधीही सोडत नाही’. त्याप्रमाणे प्रेम दिले आणि प्रेम घेतले की जिव्हाळा ऋतू आपसुकच बाराही महिने आनंदाने चालणारा ऋतू आहे.
निसर्गातील प्रत्येक फूल देवाच्या चरणी अर्पण केले जात नाही. त्याप्रमाणे काही नाती सुद्धा अगदी मनात खोलवर रुजली जात नाहीत. काय आहे माहित नाही. पण मला असे वाटते की याला कारण राग, लोभ, मत्सर, द्वेष इत्यादी कारणामुळे कदाचित मनात अढी निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्या मनात ही नाती रुजली जात नाहीत. जशी काही मोजकीच फुलं देवाला अर्पण केली जातात तशी काही नाती सुद्धा मनामनात जपली जातात आणि तीच अतिशय जिव्हाळ्याची होतात आणि जिव्हाळा हा ऋतू कायम मनात रुजला जातो.
“अनमोल हा खजिना मानवाचा
तूच निर्माण केलास हा जिव्हाळा,
सर्व माणसांबद्दल असावा सर्वाना
एकमेकांबद्दल मृदू कनवाळा…”
वेळ प्रत्येक वेळेस सांगून येत नसते आणि याचे व्यवस्थापन करणे फार कठीण नसते. तसे पाहायला गेले तर सोपे पण नसते. वेळ व्यवस्थापनाची सर्वात प्रभावी पद्धत आहे. आपण रात्री झोपताना दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी करून ठेवावी. ही यादी करताना अतिशय महत्त्वाच्या कामानुसार ती यादी करावी. सर्वात महत्त्वाचे काम सर्वात पहिल्यांदा केले तर आपले अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची शक्यता असते. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर कुठलाही विचार न करता पहिल्या कामाची जी यादी आहे त्याच कामासाठी आपण बाहेर पडावे आणि काम संपेपर्यंत थांबू नये. जर तिथे झाले नाही, तर दुसरे काम करावे तिथे नाही झाले तिसरे काम करावे अशा प्रकारे कामांची यादी तयार ठेवावी.
कारण तिथे आपण वेळेचे नियोजन केलेले असते आणि वेळ वाचवणार असतो. एक आठवडा तुम्ही असे वेळेचे नियोजन करून पाहिले तर निश्चितच तुम्हाला ही सवय लागेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेला असे छान नियोजन करून आपल्या वेळेचे व्यवस्थापन कराल. वेळ धावत असते. त्या वेळेचा पुरेपूर वापर करून घ्यावा.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
==========



