Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

जब चिड़िया चुग गई खेत

0 4 8 2 9 4

आभारीय मनोगत’; डॉ संजय पाचभाई

जब चिड़िया चुग गई खेत

माझ्या ‘होकार देऊन पहा’ या रचनेला सर्वोत्कृष्ट दहामध्ये स्थान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे मनःपूर्वक आभार.

मी तिले कॉलेज मंदी पायले, नुकतच परवेस घेतला तिनं..! अबब…!! पायतो तं का? लय सुंदर जी.! बदामा सारखे डोरे ( माये डोरे खोबणीत गेलेले पयले पासून. चेहरा धूतला तं डो-याले पाणी नायी लागत. मंग नुसत्या डो-याले पाणी लावा लागते असो).गालावर लाली जसी रोज रूस लावत असण. ‘पायल्या बराबर कलेजा खल्लास झाला’. आता तिले पटवाचच पक्का ईचार केला. मंग तिच्या नावावर एक रचनास लिवून काढली.

‘कि’ ती नाजूक तुझे ओठ
‘शो’ धूनही ना भेटेल लाखात
‘री’ झवावी वाटते लेखणी सौंदर्यापुढे.

अशी तिच्या पूर्ण नावाची होती. उगाच पोपटपंची नायी लावत. रचना तिले लयी भावली मंग हरूसकन तिले मणलं, ‘ तू होकार देऊन पहा’. पक्की सटकली जी मायावर. मने कविता लिवून पोट भरसीन का मणे मा$$$$वालं. आवं आयकून तं घे, मी डॉ. बनीन आणं दवाखाना चालला तं जमण ना मंग..!! नायी नायी मणता मणता होकार देल्ला राजे हो. आता पस्तावते, का पायलं मणते तुह्यामंदी अन् होकार देल्ला. मंग मी बी मणतो,” अब पछताने से क्या फायदा, जब चिड़िया चुग गई खेत”.

✍️मृद्गंध✍️
डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर
© सदस्य मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे