0
4
8
2
9
4
बंध रेशमाचे
हे प्रेम तुझें माझे रेशमाचे बंध जसे
तू माझ्यात अन मी तुझ्यात वसे
झाला भार फुलाचा डहाळीला
फुल अलगद पडले बाजूला
मधुमास गडे आपल्या मनाला
भेट होइल का पुढच्या क्षणाला
बांध फुटेल हा संयमाचा
फोड आत्तातरी शब्दाला वाचा
मनी मोर पिसारा फुलतो
बिन झोका आकाशी झुलतो
तू असा कसा धीट काळजाचा
मनी टोचतात रे या फुटलेल्या काचा
मन वेग वाऱ्याचे गूज अंतरीचे धावे
वाटते तूझ्या जवळ बसून तुला पहावे….
सुरेखा चित्ते
जि रायगड
0
4
8
2
9
4



