पाडळदा येथे १०० वा रामधुन कार्यक्रम रास गरबासह उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
पाडळदा येथे १०० वा रामधुन कार्यक्रम रास गरबासह उत्साहात संपन्न
“सत्कर्म करजो अने करायलेजो” गुर्जरबोलीतील गीतासह ” वृक्षरोपण ” करुन जनप्रबोधन
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
नंदुरबार (दि ११ डिसे.) राम नाम संकिर्तन व ग्राम देवता पुजारी संकल्प १०८ गाव परिक्रमा अंतर्गत नंदुरबार जिल्हयातील शहादा तालुका पाडळदा येथे १०० वा रामनाम संकिर्तन नृत्य रास गरबासह हर्षोल्हासात पार पडला. शहादा तालुक्यात पाडळदा गावात राम नाम संकीर्तन हे संत दगाजी महाराज यांचे, ग्रामदेवता पुजारी १०८ गाव परिक्रमा निमित्त गावात विविध कार्यक्रमातुन “सत्कर्म करायलेजो” हा संदेश दिला.
चोपाळे येथील संत दगा महाराज रामभक्त भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ यांनी रामनाम धुनचे पाडळदा येथे रासखांब,मुरलीमनोहर मंदिर तसेच मारुती मंदिर ,दरवाजा परिसरात आयोजन केले होते. सर्व परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला होता. मंदिर परिसरात रोशनाई करण्यात आली होती. रस्ते रांगोळी व फुलांनी सजविणे होते. गावातील महिला तसेच तरुण युवा व युवतीनी कार्यक्रमास विशेष रंग भरला. गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले. तसेच वृक्षरोपण करून सामूहिक पर्यावरण रक्षणात सहभागी झाले.
या कार्यक्रमानिमित्त वल्लभ विद्यामंदिर परिसरात पिंपळ ,वड तसेच लिंब या वृक्षांचे रोपण करुन त्यास संरक्षक जाळी बसविण्यात आली. आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात दत्तात्रय पाटील,मधुकर चौधरी,रमेश चौधरी,सुभाष पाटील, छोटूलाल पाटील,अमृतचौधरी, तुषार पाटील, वासुदेव पाटील, संजय चौधरी,अशोक पाटील, अंबालाल चौधरी,रविंद्र पाटील,शरद चौधरी असे सर्व ग्रामस्थ तसेच वृक्षारोपणसाठी वल्लभ विद्यामंदिर चे पर्यवेक्षक गणेश पाटील,शिक्षक महेंद्र पाटील ,भूपेंद्र पाकळे उपस्थित होते.



