Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

अल्पायुषी परी जगास सौंदर्यदृष्टी बहाल करणारी…कळी’; शर्मिला देशमुख -घुमरे

मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण

0 5 9 4 1 4

अल्पायुषी परी जगास सौंदर्यदृष्टी बहाल करणारी…कळी’; शर्मिला देशमुख -घुमरे

मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण

एक होती कळी, रूसून बसली
हलवले डुलवले, तरी नाही हसली

नुकतीच लागलेली झाडावरची पहिलीच कळी ती ! किती सुंदर ! किती लोभस ! मनात भरणारी. झाडाचे पहिलेच मातृत्व उमलताना पाहून निसर्गाने ही तिला वरदहस्तच दिला असावा. खूप खुश होती ती आईच्या मांडीवर. जणू स्वर्ग जाणवत होता तिला. हे सुंदर जग तिला लवकरच पहायला मिळणार होते. फुलपाखरांसवे हितगुज करायचे होते, भवऱ्यांचे गुंजारव ऐकायचे होते. झाडास तर जणू आकाश ठेंगणे झाले होते. तिच्या कौतुकाने आसमंत सुगंधित झाला होता. कवी कल्पनांना धुमारे फुटायले होते तिच्याकडे पाहून.. पण …पण… अचानक काळाने घाला घातला अन् एक अल्लड मुल तिथे आले आणि पटकन कळीला तोडून चुरगाळून मुरगाळून टाकले.कोण या वेदना!! क्षणभरात कळी बरोबर झाडाचे जीवन उध्वस्त झाले.

असेच नाही का समाजात आपण रोज पाहत.अशा कितीतरी निरागस कळ्या कुस्करून टाकल्या जातात.कळी ,फुले, वृक्षवेली, पक्षी, फुलपाखरे यांना चालत चालत ओरबडताना, तोडताना किती यातनांना सामोरे जावे लागत असेल .बोलता येत नाही, रडता ही येत नाही.. बिचारी मुकी ती. सजीव असूनही विना तक्रार सर्व सहन करून शक्य तेवढा आनंद देण्याचा प्रयत्न करतो हा निसर्ग, हा परिसर. पावसाळा आला म्हणजे चोहीबाजूने पसरलेली हिरवळ मनाला भुरळ घालते पण ती जोपासणे, जपणे किती आवश्यक आहे याचे संस्कार आज उरले नाहीत.

संवेदनशीलता आणि सौंदर्यदृष्टीचा अभाव आजच्या पिढीमध्ये प्रकर्षाने जाणवतोय. प्रत्येक पालकाचे, शिक्षकांचे, समाजाचे कर्तव्य आहे समोर घडणाऱ्या छोट्याशाच दिसणाऱ्या या घटनांना थांबवणे. नाहीतर याच छोट्या छोट्या असंवेदनशील घटना कधी विकृतीचे रौद्ररूप घेतील सांगता येत नाही..आपण हतबल असू आणि फक्त आपले कवी मन सांगत राहील ….एक होती कळी…!!

आज मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेमध्ये “एक होती कळी” हा विचार करायला लावणारा विषय राहुल दादांनी दिला. वेगवेगळ्या कल्पना समूहामध्ये आज पाहायला भेटल्या. सर्व बालकवींना पुढील लेखनासाठी भरभरून शुभेच्छा!!! मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल शतश: ऋण !! चला तर मग फुलवायला जाऊ एखाद्या कळीचे जीवन .. धन्यवाद…!!!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे