Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

‘प्रेरणा विकास सोसायटी’च्या माध्यमातून २० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध

हिंगणा शहर प्रतिनिधी

0 5 2 4 6 3

‘प्रेरणा विकास सोसायटी’च्या माध्यमातून २० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध

हिंगणा शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर/ हिंगणा : (दि २९) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रेरणा विकास सोसायटीतर्फे एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. “आधी शक्ती गारमेंट्स” या शिवणकला प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून तब्बल २० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना स्वावलंबी बनण्याचा नवा मार्ग मिळाला आहे.

या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत महिलांना शिवणकामाचे आधुनिक तंत्र, शिवण मशीन हाताळणी, तसेच विविध प्रकारचे कपडे तयार करण्याचे सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना घरबसल्या किंवा लघुउद्योगाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण होत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ पत्रकार श्री. विनायकजी इंगळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. निलीमा गोबाडे, श्री. संतोष ढाले , सौ. रागिणी जवंजळकर, तसेच प्रेरणा विकास सोसायटीचे सचिव श्री. पदमाकर बुरणुरे आणि एकल महिला समन्वयक नागपूर जिल्हा सौ. आशा बुरणुरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होते. तसेच, महिलांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा, असेही आवाहन करण्यात आले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम एक आदर्श ठरत आहे. भविष्यातही अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून अधिकाधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला रोशनी कोहळे , शालिनी वाघमारे ,अर्चना वाटगुले, उषा नाफाडे ,पुष्पा बाचाले , दर्शना वासनिक, वंदना गजभिये , विशाखा शेंदरे , वैशाली धावडे , शिल्पा राठोड ,स्वेता सोनुले , इशा गंडाईत, शीला देशमुख इत्यादी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे